सलमान खानच्या लव्ह लाइफवर शाहरुख खानची टिप्पणी, म्हणाला "बायको इकडे-तिकडे शोधतोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:54 IST2025-10-13T09:53:54+5:302025-10-13T09:54:09+5:30

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखनने सलमान खानच्या लव्ह लाइफवरही केलेली टिप्पणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Shah Rukh Khan comments on Salman Khan's love life Calls Laapataa Ladies A Film On Actor Life | Filmfare Awards 2025 | सलमान खानच्या लव्ह लाइफवर शाहरुख खानची टिप्पणी, म्हणाला "बायको इकडे-तिकडे शोधतोय..."

सलमान खानच्या लव्ह लाइफवर शाहरुख खानची टिप्पणी, म्हणाला "बायको इकडे-तिकडे शोधतोय..."

Shahrukh Khan Funny Jab At Salman Khan Love Life : बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खान त्याच्या जबरदस्त विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. नुकत्याच अहमदाबादमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्याने करण जोहरसोबत सूत्रसंचालन करताना धमाल उडवून दिली.  स्टेजवर त्यानं अनेक कलाकारांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी शाहरुखने सलमान खानच्या लव्ह लाइफवरही एक मजेशीर टिप्पणी केली. ही टिप्पणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानने सुपरस्टार सलमान खानचे कौतुक केले. पण त्याचवेळी, शाहरुखनं अचानक सलमानच्या अविवाहित असण्यावर विनोदी टिप्पणी करताना म्हटलं,  "एक माणूस आहे जो आपली बायको  इकडे तिकडे शोधतो आहे".  यावरच न थांबता शाहरुखने पुढे म्हटले,"ही पण कमालची गोष्ट आहे, आमिर खानने सलमान भाईवर चित्रपटच बनवला आहे". यानंतर शाहरुख खानं आमिर खानचा चित्रपट 'लापता लेडीज'चं कौतुक केलं.

सलमान खानचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत
शाहरुख खानचा हा संपूर्ण विनोद सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल होता. सलमानचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच माध्यमांसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते.  त्याचं नाव ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण, अभिनेता अजूनही अविवाहित आहे.

'लापता लेडीज' चित्रपटाची कथा 

दरम्यान, 'लापता लेडीज' हा चित्रपट किरण रावनं दिग्दर्शित केला आहे. यात नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. त्याची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. 'लापता लेडीज' चित्रपटात दोन नवविवाहित तरूणी, लग्नानंतर त्यांची होणारी अदलाबदल अन् त्यानंतर घडत जाणाऱ्या घटना यावर हा सिनेमा आधारित आहे. लापता लेडीज चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे. 

Web Title : शाहरुख खान ने सलमान की लव लाइफ पर उड़ाया मज़ाक

Web Summary : शाहरुख खान ने एक पुरस्कार समारोह में सलमान खान के अविवाहित होने पर मज़ाकिया टिप्पणी की, जिसमें आमिर खान की 'लापता लेडीज' का जिक्र था। सलमान के पिछले रिश्ते जग जाहिर हैं।

Web Title : Shah Rukh Khan Jokes About Salman's Love Life at Event

Web Summary : Shah Rukh Khan humorously commented on Salman Khan's bachelorhood at an award show, referencing Aamir Khan's 'Laapataa Ladies'. Salman's past relationships are well-known.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.