शाहरुख खान आणि काजोलला खटकतात एकमेकांच्या या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:30 IST2018-12-03T06:30:00+5:302018-12-03T06:30:02+5:30
शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असून या दोघांनी काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या जोडीचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘बाझीगर’ आणि शेवटचा ‘दिलवाले’.

शाहरुख खान आणि काजोलला खटकतात एकमेकांच्या या गोष्टी
‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार’ सोहळा 18 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील सर्व नामवंत तारे-तारका या पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित होत्या.
शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असून या दोघांनी काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या जोडीचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘बाझीगर’ आणि शेवटचा ‘दिलवाले’. या कलाकारांच्या जोडीची लोकप्रियता लक्षात घेऊन या दोघांना ‘लक्स गोल्डन रोझ टाइमलेस जोडी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दोघांनी मिळून सात सुपरहिट चित्रपट दिले असून त्यातील सर्वात यशस्वी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आहे. आजही मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काजोलशी खास मैत्री असलेल्या शाहरूख खानने त्यांच्या मैत्रीविषयी सांगितले, “हा पुरस्कार मला केवळ काजोलमुळेच मिळत आहे. काजोल ही खूप चांगली अभिनेत्री असून तिच्यामुळेच माझ्यातील अभिनेत्याचाही वेळोवेळी कस लावला आहे. हा पुरस्कार मला तिच्याबरोबर मिळाला, याचा मला विशेष आनंद होत असून त्याद्वारे आम्ही आमच्या पडद्यावरील जोडीचा रजत महोत्सव साजरा करीत आहोत, असं म्हणावं लागेल. हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद होत असून मला यापुढेही काजोलबरोबर अनेक भूमिका साकारायची संधी मिळेल, अशी आशा आहे.”
यावेळी दिग्दर्शक करण जोहरने या दोघांना एक रॅपिड फायर प्रश्नावली विचारली. त्याने काजोलला विचरले, “शाहरूखची कोणती गोष्ट तुला आवडते, तू सहन करतेस आणि तुला अजिबात आवडत नाही?” त्यावर काजोल म्हणाली, “पडद्यावर दिसणारी त्याची ऊर्जा आणि त्याचा प्रामाणिकपणा मला आवडतो. त्याच्याबद्दल न आवडणारी एकही गोष्ट नाही. पण तो जेव्हा येण्यास उशीर करतो, ते मी सहन करते.”
हाच प्रश्न शाहरूखला काजोलबद्दल विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, “मलाही तिचा प्रामाणिकपणा आणि तिचं ओरडणं आवडतं. पण तिच्या नेमक्या याच दोन गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत आणि मी तिच्या याच दोन गोष्टी सहनही करतो!”
लक्स गोल्डन रोझ पुरस्कार’ सोहळ्यात या जोडीने केलेली धमाल प्रेक्षकांना ‘स्टार प्लस’वर लवकरच पाहायला मिळणार आहे.