"मस्त फ्रंट फूट शॉट"; जय शाह यांच्या ट्विटवर शाहरुखची दाद, अक्षय कुमारही खूश झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:13 AM2022-10-28T11:13:22+5:302022-10-28T11:24:34+5:30

BCCI चे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांनी केलं आहे.

Shah rukh khan and Akshay Kumar praises BCCI historic decision | "मस्त फ्रंट फूट शॉट"; जय शाह यांच्या ट्विटवर शाहरुखची दाद, अक्षय कुमारही खूश झाला!

"मस्त फ्रंट फूट शॉट"; जय शाह यांच्या ट्विटवर शाहरुखची दाद, अक्षय कुमारही खूश झाला!

googlenewsNext

BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी अलिकडेच भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार असल्याचा निर्णय घेतला.महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटीसाठी १५ लाख, वन डे साठी ६ लाख आणि ट्वेंटी-२० साठी ३ लाख) दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असेही जय शाह यांनी ट्विट केले. न्यूझीलंडने तीन महिन्यांपूर्वी समान वेतन त्यांच्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केले होते. 
बीसीसीआयच्या या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं असून सोशल मीडियावर या निर्णयाचे कौतुक केले आहे.

शाहरुख खाननेही या निर्णयाचे कौतुक करत पोस्ट केली आहे. जय शाह यांचे ट्विट शेअर करत त्यांनी लिहिले, 'मस्त फ्रंट फूट शॉट. खेळात सर्वजण समान आहेत. इतरांनीही याचे पालन करावे अशी आशा आहे.'  शाहरुख स्वतः क्रिकेटचा मोठा चाहता आहे. त्याची स्वतःची आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्स आहे. याशिवाय तिच्याकडे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये महिला क्रिकेट संघही आहे.

अक्षय कुमारने  (Akshay Kumar)  ट्विट करून लिहिले, 'दिल ख़ुश हो गया यह पढ़ कर. छा गए , बीसीसीआय जय शाह हा एक चांगला निर्णय आहे. यामुळे महिला (Women) पुढील व्यावसायिक करिअर म्हणून क्रिकेटची निवड करतील. 

तापसी पन्नूने ट्विट करून लिहिले, 'खूप मोठे पाऊल, सामान कामासाठी सामान पैसे. एक उत्तम उदाहरण मांडल्याबद्दल बीसीसीआयचे (BCCI) चे आभार.

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे आणि टाळ्यांच्या इमोजीद्वारे या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. अनुष्का शर्मा लवकरच'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 
 

Web Title: Shah rukh khan and Akshay Kumar praises BCCI historic decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.