'जब तक है जान'नंतर पुन्हा दिसणार शाहरुख, कॅटरिना आणि अनुष्का एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 15:46 IST2017-06-01T10:15:36+5:302017-06-01T15:46:58+5:30
शाहरुखन खानच्या आगामी चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीचे नाव ही नक्की करण्यात आले आहे. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या चित्रपटात शाहरुख ...

'जब तक है जान'नंतर पुन्हा दिसणार शाहरुख, कॅटरिना आणि अनुष्का एकत्र
श हरुखन खानच्या आगामी चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीचे नाव ही नक्की करण्यात आले आहे. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या चित्रपटात शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत अनुष्का शर्मा पण दिसणार आहे. या तिघांनी या आधी 2012 आलेल्या जब तक है जान मध्ये एकत्र काम केले होते. शाहरुखच्या याचित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याच्या भूमिकेबाबत तो चर्चेत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कॅटरिनाचे नाव याचित्रपटासाठी कंन्फर्म झाले. यानंतर या चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावासाठी अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होती. निर्मात्यांनी अखेर अनुष्का शर्माच्या नावावर शिक्का मारला आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि कलर्स यलो प्रोडक्शन करणार आहे.
दिग्दर्शक आनंद एल राय म्हणाले. माझ्या आगामी चित्रपटात शाहरुख, कॅटरिना आणि अनुष्काला घेऊन मी उत्साहित आहे. आमच्या पहिल्या मीटिंगपासून अनुष्का शर्मा आपल्या भूमिकेबाबत खूप एक्सायटेड आहे. सध्या आम्ही चित्रपटातील अनुष्काच्या लूकवर काम करतो आहे. शाहरुख खानच्या या याचित्रपटाचा बजेट जवळपास 150 कोटी असल्याचे सांगण्यात येते आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका जल माणसाची भूमिका साकारणार आहे. तर अनुष्का शर्मा मेंटली रिटार्यड व्यक्तीची. या चित्रपटाकडे बॉलिवूडमधला सगळ्यात मोठ्या प्रोजेक्ट म्हणून पाहण्यात येतंय. गेल्या आठवड्यापासून या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे. 2018 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
अनुष्का आणि शाहरुखच्या जोडीचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी दोघे रब ने बना दी जोडी, जब तक है जान, अगस्त आणि इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपट दोघांनी एकत्र काम केले आहे.