Shades of Saaho : पाहा, प्रभासच्या ‘साहो’चा ‘बियॉन्ड द लिमिट्स’ मेकिंग व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 13:51 IST2018-10-23T13:50:26+5:302018-10-23T13:51:15+5:30
‘साहो’च्या मेकर्सनी चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ जारी केला आहे. आज प्रभासच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हा व्हिडिओ जारी करण्यात आला.

Shades of Saaho : पाहा, प्रभासच्या ‘साहो’चा ‘बियॉन्ड द लिमिट्स’ मेकिंग व्हिडिओ!!
साऊथ सुपरस्टार प्रभास याच्या ‘साहो’ या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट आलेला नाही. त्यामुळेही ‘साहो’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. आता ‘साहो’च्या मेकर्सनी चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ जारी केला आहे. आज प्रभासच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, ‘शेड्स आॅफ साहो’अशा सीरिजअंतर्गत असे आणखी व्हिडिओ रिलीज होणार आहेत.
‘साहो’कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत आणि चित्रपटाचा पहिला मेकिंग व्हिडिओ बघितल्यानंतर या अपेक्षा आणखी वाढणार, हे नक्की आहे. कारण व्हिडिओ बघता हा चित्रपट ‘बियॉन्ड द लिमिट्स’ असणार, असेच दिसतेय.
हा व्हिडिओ अबू धाबीमधील शूटींगदरम्यानचा आहे. व्हिडिओत प्रभाससोबत श्रद्धा कपूरही झलक पाहायला मिळतेय. जीथरारक स्टंट्स करताना दिसतेय. अॅक्शन आणि थ्रीलरने भरलेला हा व्हिडिओ अपलोड केल्याच्या काही मिनिटांतच लाखो लोकांनी पाहिला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करतेय. अबू धाबीतील शूटींगदरम्यान सुमारे ४०० जणांची टीम काम करत होती. या चित्रपटातील अॅक्शन सीन्स हॉलिवूड अॅक्शन डायरेक्टर केनी बेट्स याने डिझाईन केले आहेत.
‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे़ तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रभासचा आज ३९ वा वाढदिवस आहे. प्रभासच्या वाढदिवशी ‘साहो’चा पहिला व्हिडिओ जारी करण्यात येईल, अशी घोषणा आधीच करण्यात आली होती. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.