'शोले'तील 'गब्बर'चा मुलगा, राणी मुखर्जीचा पहिला हिरो; आता कुठे गायब आहे अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:21 IST2025-11-24T12:20:26+5:302025-11-24T12:21:28+5:30
'राजा की आयेगी बारात'मध्ये दिसलेला हा अभिनेता आठवतोय?

'शोले'तील 'गब्बर'चा मुलगा, राणी मुखर्जीचा पहिला हिरो; आता कुठे गायब आहे अभिनेता?
एकेकाळी सिनेमांमध्ये दिसलेले काही कलाकार एकाएकी गायब झाले आहेत. मग ते आउटसायडर्स असो किंवा स्टारकिड्स...काहींना यश मिळालं तर काहींना अपयश. अभिनेत्री राणी मुखर्जीचा पहिला सिनेमा आठवतोय? 'राजा की आयेगी बारात' असं सिनेमाचं नाव होतं जो १९९६ साली रिलीज झाला होता. यामध्ये राणी मुखर्जीच्या अपोझिट दिसलेला हिरो आज कुठे गायब आहे?
'राजा की आयेगी बारात'मध्ये शादाब खान हा मुख्य भूमिकेत होता. सिनेमात तो मुख्य अभिनेता असूनही त्याची खलनायकी भूमिका होती. 'शोले' गाजलेल्या सिनेमात गब्बर या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अमजद खान यांचा शादाब हा मुलगा आहे हे खूप की जणांना माहित आहे. शादाबने 'राजा की आयेगी बारात' मधून पदार्पण केलं होतं. मात्र हा सिनेमा चांगलाच आपटला होता. मात्र या सिनेमातून राणी मुखर्जीचं नशीब फळफळलं होतं. तिच्याकडे सिनेमांची रांग लागली. तर दुसरीकडे शादाबला मात्र सिनेमे मिळाले नाहीत.

शादाब खानने नंतर 'हे राम,'बेताबी' आणि 'रिफ्यूजी' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र त्याला कशातच यश मिळालं नाही. एकंदर त्याचं करिअर फ्लॉप ठरलं. शेवटचा तो 'रोमियो अकबर वॉल्टर'मध्ये होता. २०२० साली आलेल्या 'स्कॅम १९९२' वेब सीरिजमध्येही तो दिसला.
शादाब खानने २९ वर्षात मोजकेच सिनेमे केले. आता अभिनय बाजूला ठेवून तो फुल टाईम लेखक झाला आहे. वडील अमजद खान यांच्यावर त्याने बायोपिकही लिहिली होती. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्याने याचं लाँचिंग केलं होतं. २९१३ मध्ये त्याची 'शांती मेमोरियल' आणि २०१५ मध्ये 'मर्डर इन बॉलिवूड' ही पुस्तकंही प्रकाशित झाली.