ना अमिताभ बच्चन ना कंगना राणौत; सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कार 'या' अभिनेत्रीच्या नावावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:00 IST2025-09-23T19:00:00+5:302025-09-23T19:00:01+5:30
७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, सर्वात जास्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणी जिंकले माहितीये का?

ना अमिताभ बच्चन ना कंगना राणौत; सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कार 'या' अभिनेत्रीच्या नावावर
National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. आजच ७१ वा राष्ट्रीय चित्रपच पुरस्कार सोहळा संपन्न झाला. अभिनेता शाहरुख खानला ३३ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच राणी मुखर्जीलाही ३२ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच या पुर्सकाराने सम्मानित करण्यात आले. दरम्यान सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेली सेलिब्रिटी कोण माहितीये का?
सर्वाच जास्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सेलिब्रिटी कोण असं विचारलं तर अमिताभ बच्चन हे नाव आपसूक येईल. पण अमिताभ बच्चन आणि कंगना राणौत दोघंही या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतात. अमिताभ बच्चन यांनी 'अग्निपथ' सिनेमासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नंतर त्यांना 'ब्लॅक', 'पीकू', 'पा' या सिनेमांसाठीही पुरस्कार प्राप्त झाला. तर कंगना राणौतला 'क्वीन', 'तनू वेड्स मनू रिटर्न्स','पंगा' आणि 'मणिकर्णिका' साठी राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. अभिनेते कमल हासन यांनाही चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पण एका सेलिब्रिटीच्या नावावर ५ राष्ट्रीय पुरस्कार आहेत. कोण आहे ती सेलिब्रिटी?
या आहेत शबाना आजमी. त्यांना 'अंकुर', 'अर्थ', 'खंडहर', 'पार','गॉडमदर', या पाच उत्कृष्ट सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. शबाना आजमी, अमिताभ बच्चन, कंगना राणौत, कमल हासन यांच्यानंतर नसीरुद्दीन शाह, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी, पंकज कपूर, मिथून चक्रवर्ती आणि मामूटी यांची नावं येतात.