शबाना आझमी बनल्या गायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:10 IST2016-09-13T06:18:46+5:302016-09-13T12:10:27+5:30
दोन दशकाहूनही अधिक काळ अभिनयाची कारकीर्द गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच त्यांच्या नव्या इनिंगला सुरूवात करणार आहेत. अपर्णा ...

शबाना आझमी बनल्या गायिका
द न दशकाहूनही अधिक काळ अभिनयाची कारकीर्द गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच त्यांच्या नव्या इनिंगला सुरूवात करणार आहेत. अपर्णा सेन यांच्या 'सोनाटा' सिनेमासाठी रविंद्रनाथ टागोरांची गाणी शबाना आझमी गाणार आहेत. महेश एलकुंचवार यांच्या नाटकावर आधारित सोनाटा हा इंग्रजी सिनेमा अाहे. इतके वर्ष अभिनेत्री म्हणून रसिकांनी माझ्यावर प्रेम केलंय. आता गायिका म्हणूनही पुढे मला पसंती मिळेल अशी आशा आहे असे शबाना आझमी यांनी म्हटलंय. 'सोनाटा' सिनेमा 20 सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. याआधी अपर्णा सेन यांच्या 'सती', 'पिकनिक' आणि '15 पार्क एव्हेन्यु' सिनेमात शबाना आझमी यांनी काम केलंय.