from the sets of sanjay dutt biopic : ​रणबीर कपूरच्या टोपीखाली दडलयं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:38 IST2017-02-21T07:54:14+5:302017-02-21T13:38:44+5:30

सध्या रणबीर कपूरमधील एक बदल तुम्हाला जाणवला? होय, रणबीरचे वजन वाढलेय. पण याशिवाय रणबीरमधील एक बदल नोटीस करण्यासारखा आहे. ...

From the sets of sanjay dutt biopic: What are Ranbir Kapoor's underpants? | from the sets of sanjay dutt biopic : ​रणबीर कपूरच्या टोपीखाली दडलयं काय?

from the sets of sanjay dutt biopic : ​रणबीर कपूरच्या टोपीखाली दडलयं काय?

्या रणबीर कपूरमधील एक बदल तुम्हाला जाणवला? होय, रणबीरचे वजन वाढलेय. पण याशिवाय रणबीरमधील एक बदल नोटीस करण्यासारखा आहे. तो म्हणजे,अलीकडे रणबीर जिथे जाईल, तिथे त्याच्या डोक्यावर टोपी दिसते. या टोपीचे रहस्य आहे तरी काय? शेवटी याचा छडा तर लावायलाच हवा. अखेर आम्ही या टोपीमागच्या कारणाचा शोध घेतलाच. या टोपीमागे कारण आहे, संजय दत्त...!! 

आश्चर्य वाटले ना, पण हेच खरे आहे. रणबीरच्या टोपीआड दडलाय, संजय दत्त. खरे वाटत नसेल तर संजय दत्तच्या बायोपिकच्या सेटवरचे हे फोटो पाहा. सध्या रणबीर या बायोपिकच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे आणि यासाठी रणबीरने आपले केस वाढवले आहेत. हे वाढवलेले केस लोकांना दिसू नये, म्हणून रणबीर अलीकडे सतत टोपी घालून फिरतोय. ९० च्या दशकात संजय दत्तचे केस लांब होते. त्याचे ते लूक त्यावेळी भलतेच लोकप्रीय झाले होते. संजय दत्तच्या त्याच लूकमध्ये रणबीर सध्या दिसतोय. सेटवरच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीर अगदी हुबेहुब संजय दत्त सारखा दिसतोय. यात त्याने कथ्थ्या रंगाचे शर्ट, ब्लॅक वेस्ट कोर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला आहे. त्याच्या केसांची स्टाईल एकदम संजय दत्तसारखी दिसतेय.







राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरसोबत दिया मिर्झा आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत. अभिनेत्री मनीषा कोईराला या चित्रपटात संजय दत्तची आई म्हणजेच नर्गिसची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहिर झालेली नाही. पण रणबीर ज्याप्रकारे या चित्रपटासाठी मेहनत घेतोय, ते पाहून आमच्याप्रमाणे तुम्हालाही या चित्रपटाची अधिक काळ प्रतीक्षा करणे जीवावर आले असणार. होय ना?

ALSO READ : SANJAY DUTT BIOPIC: दिसला रे दिसला...रणबीर कपूर संजय दत्तसारखा दिसला!

 

Web Title: From the sets of sanjay dutt biopic: What are Ranbir Kapoor's underpants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.