2019मध्ये येणार सलमान खानच्या 'किक'चा सीक्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 11:52 IST2017-06-16T06:22:26+5:302017-06-16T11:52:26+5:30
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा किकचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किकचा सीक्वल येणार हे एकून सलमनाच्या चाहत्यांना नक्कीच ...

2019मध्ये येणार सलमान खानच्या 'किक'चा सीक्वल
ब लिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा किकचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किकचा सीक्वल येणार हे एकून सलमनाच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असलेच. मात्र हा चित्रपट पाहाण्यासाठी त्यांना वाट पाहवी लागणार आहे. 2014मध्ये आलेल्या किकचा सीक्वला 2019च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक निर्माता साजिद नाडियाडवाला खूप दिवसांपासून या चित्रपटच्या स्क्रिप्टवर काम करतो आहे. पुढच्या महिन्यात तो या चित्रपटाची स्क्रिप्ट सलमान खानला सांगणार आहे. याचित्रपटात सलमान खान डब्बल रोलमध्ये दिसणार आहे. एकात तो हिरो तर दुसऱ्यात व्हिलन दिसणार आहे. 2018च्या जून-जुलै महिन्यांपासून सलमान या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार असल्याचे कळतेय. सध्या सलमान ट्युबलाइटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे तसेच तो टायगर अभी जिंदा है या चित्रपटाचे शूटिंग देखील करतोय. यानंतर तो रेमो डिसूजा दिग्दर्शित एका डान्स ड्रामा चित्रपटातही दिसणार आहे. याचित्रपटासाठी सलमान डान्सची विशेष ट्रेनिंग घेतोय. या चित्रपटात सलमान एका 13 वर्षीय मुलीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या जोडीचा दबंग 3 सुद्धा येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. सध्या साजिद ही जुडवा 2 आणि बागी2 मध्ये व्सस्त आहे. 2014मध्ये आलेल्या किकचे दिग्दर्शन साजिदनेच केले होते. या चित्रपटात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसली होती. रणदिप हुडासुद्धा या चित्रपटात दिसला होता.