विरूष्कासोबत काढलेल्या सेल्फीवरून ए. आर. रहमानवर केली जातेय टीका, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 21:10 IST2017-12-29T15:40:41+5:302017-12-29T21:10:41+5:30

काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे पार पडलेल्या विरूष्काच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आपल्या परिवारासमवेत पोहोचला होता. ...

A from Selfie drawn with Virus R. Remarks made on the Quran, the covenant is detailed! | विरूष्कासोबत काढलेल्या सेल्फीवरून ए. आर. रहमानवर केली जातेय टीका, वाचा सविस्तर!

विरूष्कासोबत काढलेल्या सेल्फीवरून ए. आर. रहमानवर केली जातेय टीका, वाचा सविस्तर!

ही दिवसांपूर्वीच मुंबई येथे पार पडलेल्या विरूष्काच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आपल्या परिवारासमवेत पोहोचला होता. यावेळी रहमान याने आपल्या पत्नीसह नवदाम्पत्यासोबत एक सेल्फी काढला. मात्र या सेल्फीमुळे रहमान सोशल मीडियावर ट्रोल होत असून, यूजर्सकडून त्याच्या सेल्फीला उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. होय, रहमान पत्नीसोबत विरूष्काच्या रिसेप्शनला पोहोचला असता त्याने स्टेजवर जात नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांच्यासोबत एक सेल्फीही काढला. मात्र या सेल्फीच्या नादात रहमानला यूजर्सच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. 



आता तुम्ही म्हणाल की, या सेल्फीवर टीका करण्यासारखे काय आहे? तर या सेल्फीत ए. आर. रहमान सर्वांत पुढे दिसत असून, त्याच्या पाठीमागे विराट आणि अनुष्का ब्लर झाल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे रहमानची पत्नीही त्याच्या पाठीमागे उभी दिसत आहे. अशात सेल्फी रहमानने स्वत:वर फोकस केल्याची टीका यूजर्सकडून केली जात आहे. हा सेल्फी स्वत: रहमाननेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामुळे यूजर्सकडून त्याच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. 



दरम्यान, २६ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडसह क्रिकेटजगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या अगोदर विरूष्काने दिल्ली येथेही त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिले. या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले होते, तर मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात बी-टाउनमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या परिवारासमवेत या सोहळ्यात हजेरी लावली होती. त्याचबरोबर ए. आर. रहमान यानेही आपल्या पत्नीसह सोहळ्यात उपस्थिती लावत या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

Web Title: A from Selfie drawn with Virus R. Remarks made on the Quran, the covenant is detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.