Seema Sajdeh: "दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानच्या Ex Wifeचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:05 PM2022-12-28T13:05:48+5:302022-12-28T13:21:02+5:30

Moving In With Malaika, Seema Sajdeh : आईला नशेत झिंगताना बघून मुलगा म्हणाला...,   ‘मुव्हिंग विद इन मलायका’ शोमध्ये सीमा सजदेहचा ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा...

seema sajdeh reveals son reaction to her drunk video in moving in with malaika show | Seema Sajdeh: "दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानच्या Ex Wifeचा खुलासा

Seema Sajdeh: "दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानच्या Ex Wifeचा खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची (Sohail Khan)  एक्स वाईफ सीमा सजदेह  (Seema  Sajdeh) आता घराघरात ओळखली जाते. करण जोहरच्या ‘फॅब्युलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या शोने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हिच सीमा  सजदेह मध्यंतरी एका वेगळ्याच कारणानं चर्चेत होती.  होय, 25 नोव्हेंबरला करण जोहरने एक पार्टी दिली. या पार्टीत सीमानेही हजेरी लावली. पण पार्टीनंतर जे काही झालं, ते पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती.

होय, सीमाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला होता. पार्टीतून सीमा फोनवर बोलण्यासाठी सीमा करणच्या घराच्या गेटजवळ आली होती. पापाराझींचे कॅमेरे तिला क्लिक करायला सरसावले, पण हे काय? पापाराझींना पोझ देताना सीमाचा तोल गेला होता. तिने लगेच भिंतीचा आधार घेतला आणि कसंबसं स्वत:ला सावरलं होतं. तिचा बोलण्याचा अंदाज बघून  नेटकऱ्यांनी काढायचा तो निष्कर्ष काढला होता. अगदी इतकी प्यायची कशाला, अशा शब्दांत अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती. मुझे पीने का शौक नही... गम भुलाने को..., असं एका युजरने लिहिलं. आता या व्हिडीओवर खुद्द सीमा सजदेह बोलली. हा व्हिडीओ पाहून तिच्या लेकाची काय प्रतिक्रिया होती, हेही तिने सांगितलं.

मलायकाच्या ‘मुव्हिंग विद इन मलायका’ (Moving In With Malaika) या शोमध्ये नुकतीच सीमाने हजेरी लावली. यावेळी मलायकाने सीमाला त्या व्हिडीओबद्दल छेडलं. अलीकडे तुझा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नक्कीच तुझा मुलगा निर्वाणने हा व्हिडीओ पाहिला असेल, असं मलायका म्हणाली.

यावर सीमा म्हणाली, माझा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर निर्वाणने मला कॉल केला होता. त्याने व्हिडीओवर रिअ‍ॅक्ट केलं नाही. पण माझ्या ड्रेसवर तो रिअ‍ॅक्ट झाला होता. वो क्या ड्रेस थी? एवढंच त्याने मला विचारलं. त्या व्हिडीओबद्दल तुला फक्त एवढंच बोलायचंय, असं मी स्वत:हून त्याला विचारलं होतं. पण खरं सांगू तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  दोन दिवस मी नरकात असल्यासारखं मला झालं होतं. जे काही केलं ते मी नाकारत नाहीये. असं प्रत्येकजण करतो. मी एकटीच अशी वेडी नाही जिचा त्यावेळी तोल गेला होता.

मलायकाने वाजवल्या टाळ्या...
सीमाचं ते उत्तर ऐकून मलायका टाळ्या वाजवायला लागती. तू फक्त चांगला वेळ घालवलास, पण लोक त्या दृष्टिने विचार करत नाही. महिलांना बाहेर पडून ड्रिंक एन्जॉय करण्याची परवानगी नाही का? तुमचा वेळ घालवण्याची, एन्जॉय करण्याची परवानगी नाही का? त्या व्हिडीओनंतर नको ते बोललं गेलं. पण मला कळत नाही की, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जज का केलं जातं?, असं मलायका म्हणाली. 

सीमा सजदेह हिने नुकताच सलमान खानचा भाऊ सोहेल खान याच्याशी घटस्फोट घेतला.   लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल व सीमा यांचा घटस्फोट झाला.   सीमा व सोहेल अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. एका शोमध्ये खुद्द सीमाने हा खुलासा केला होता. अर्थात आम्ही एक कुटुंब आहोत आणि सोहेल एक चांगला पिता आहे, असं ती म्हणाली होती.
 

Web Title: seema sajdeh reveals son reaction to her drunk video in moving in with malaika show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.