छोटे नवाब सैफची लेक, सारा अली खानचा हा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही क्लीन बोल्ड व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:40 IST2017-10-17T07:10:37+5:302017-10-17T12:40:37+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुलं आणि मुली आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात.गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ...

Seeing the bold version of the small Nawab Saifchi Lake, Sarah Ali Khan, you will be a clean Bold too | छोटे नवाब सैफची लेक, सारा अली खानचा हा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही क्लीन बोल्ड व्हाल

छोटे नवाब सैफची लेक, सारा अली खानचा हा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही क्लीन बोल्ड व्हाल

ंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुलं आणि मुली आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात.गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ही परंपरा सुरु आहे.आपल्या घरात सुरु असलेला अभिनयाचा वारसा दिग्गज कलाकारांची मुलं मुली पुढे नेत असतात. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुली सिनेमात एंट्री मारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यांत अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर, चंकी पांडेची लेक अनन्या, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी, यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी ही यंग जनरेशन सज्ज झाली आहे. मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणाची. सारा लवकरच 'केदारनाथ' या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री मारणार आहे. नुकतंच सारा हिला हॉट आणि बोल्ड अंदाज कॅमे-यांनी टिपलं. यावेळी सारासोबत तिचा कोस्टार आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूतसुद्धा होता. यावेळी सारानं काळ्या रंगाची शॉर्ट आणि टँक टॉप परिधान केल्याचं पाहायला मिळालं. साराचा हा अंदाज भलताच हॉट आणि तितकाच सेक्सी होता. या बोल्ड अंदाजासह तिची ऑरेंज रंगाची बॅगही तितकीच लक्षवेधी ठरली. तिच्या ड्रेसिंगसह तिच्या घायाळ करणा-या मादक अदा कुणालाही क्लीन बोल्ड करतील अशाच होत्या. सारा आणि सुशांत केदारनाथ या सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यावेळी साराचा हा हॉट अंदाज सा-यांना पाहायला मिळाला. त्यावेळी दोघंही स्क्रीप्ट वाचन करताना आणि बराच काळ एकत्र वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळालं. सारानं आपल्या भूमिकेसाठी तर विशेष ट्रेनिंगही सुरु केल्याच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत. एकता कपूर आणि किअर्ज एंटरटेन्मेंटनं केदारनाथ या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. जून 2018 साली हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे साराचा रिल हॉट अंदाज पाहण्यासाठी रसिकांना 2018 ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सारा ही छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची लेक आहे. सारानं न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सारा हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. केदारनाथ या सिनेमासह आणखी काही सिनेमा तिने साईन केल्याच्या चर्चाही कानावर पडत आहेत. बॉलिवूडमध्ये गॉडफादर अशी ओळख असलेला करण जोहर सध्या सारा अली खानवर भलताच फिदा आहे. केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलिवूडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. त्यामुळे साराचं हिंदी चित्रपटसृष्टीतील भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटल्यास वावगं ठरु नये. 

Web Title: Seeing the bold version of the small Nawab Saifchi Lake, Sarah Ali Khan, you will be a clean Bold too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.