निक जोनासच्या मनात लग्न थांबवण्याचा विचार येतो तेव्हा...! वाचा भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:37 IST2020-03-02T13:37:35+5:302020-03-02T13:37:49+5:30

खुद्द निकने एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हा किस्सा सांगितला

seeing bill of wedding nick jonas was thinking about to stop this marriage-ram | निक जोनासच्या मनात लग्न थांबवण्याचा विचार येतो तेव्हा...! वाचा भन्नाट किस्सा

निक जोनासच्या मनात लग्न थांबवण्याचा विचार येतो तेव्हा...! वाचा भन्नाट किस्सा

ठळक मुद्देनिक जोनास हे संगीत क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे.

प्रियंका चोप्रानिक जोनास यांच्यासारखे आनंदी जोडपे शोधूनही सापडणार नाही. होय, सध्या प्रियंका व निक दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. पण या लग्नातील एक भन्नाट किस्सा तुम्हाला माहित आहे का?  खुद्द निकने एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हा किस्सा सांगितला.
होय, लग्नात असे काही घडले होते की, निकच्या डोक्यात हे लग्न थांबवण्याचा विचार आला होता. ‘द लेट शो विथ जेम्स कॉर्डन’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये निकने हा किस्सा ऐकवला. हे लग्न थांबवायला हवे, असा विचार कधी डोक्यात आला होता का? असा प्रश्न निकला या शोमध्ये विचारला गेला .

या प्रश्नाचे उत्तर देताना निक आधी हसला आणि मग म्हणाला, ‘होय, लग्नाचे वाढते बिल पाहिल्यानंतर खरोखरच हे लग्न थांबवायला हवे, असे मला वाटले होते.’  निकचे उत्तर ऐकल्यानंतर शोच्या होस्टला हसू आवरले नाही. 


याच शोमध्ये निकने आणखी एक खुलासा केला. होय, एकेकाळी सिंगींग करिअर सोडण्याचा विचारही निकने केला होता. त्याने सांगितले की, ‘एकेकाळी मी बेसबॉलमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता. 2008-09 मध्ये आम्ही टूरवर होतो आणि शिकागोत थांबलो होतो. लेखक, पत्रकार वा अशा प्रकारचे कुठले काम करण्याची माझी इच्छा होती. पण सगळ्यांत मोठे स्वप्न होते ते बेसबॉल टीमसाठी खेळणे. ’

निक जोनास हे संगीत क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे. निक 81 आठवड्यांसाठी बिलबोर्ड आर्टिस्ट 100 चार्टवर होता.  जोनास ब्रदर्स बँडमध्ये तो आणि त्याचे भाऊ कॅव्हिन व जो यांचा समावेश आहे. या बँडने व्हॉट मॅन गॉटा डू, सकर यासारखी हिट गाणी दिली आहेत.
 

Web Title: seeing bill of wedding nick jonas was thinking about to stop this marriage-ram