ह्या अभिनेत्याला पाहून आमीर खान विसरून जायचा डायलॉग्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 16:49 IST2018-09-07T16:47:18+5:302018-09-07T16:49:57+5:30

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांची मुख्य भूमिका असलेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाचे सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Seeing this actor, Aamir Khan forgets dialogues | ह्या अभिनेत्याला पाहून आमीर खान विसरून जायचा डायलॉग्ज

ह्या अभिनेत्याला पाहून आमीर खान विसरून जायचा डायलॉग्ज

ठळक मुद्देअमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच दिसणार एकत्र रुपेरी पडद्यावर'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात समुद्र लुटारूची कथा

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांची मुख्य भूमिका असलेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाचे सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चनआमिर खान या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. आमीरने अमिताभ बच्चन समोर असले की मी माझे डायलॉग विसरून जायचो असे सांगितले. 

आमीरने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तो म्हणाला की, 'ते समोर असले की मला धड बोलताही येत नाही. आम्ही कामाला सुरूवात केली तर मला माझे डायलॉगही आठवत नव्हते. अनेकदा मी स्वत: भरकटायचो. '

मी आणि आमिताभ बच्चन सेटवर शूटिंगच्या आधी एकत्र बसतो आणि आमचे डायलॉग तोंडपाठ करून घेतो. मात्र एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करताना दडपण येत असल्याचे आमीरने सांगितले.
एका कार्यक्रमादरम्यान एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आमीर खान महान अभिनेता असल्याचे अमिताभ बच्चन म्हणाले होते व त्यांनी पुढे सांगितले की, मी आमीरचे अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि त्याचा आनंदही घेतला आहे. तो एक परिपूर्ण व उत्तम अभिनेता आहे. 
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे दिग्दर्शन 'धूम ३'चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य करत आहेत. या चित्रपटात समुद्री लुटारुची कथा दाखवण्यात आली असून आमीर खान आणि अमिताभ बच्चनसोबत कतरिना कैफ आणि दंगल गर्ल फातिमा सना शेखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Seeing this actor, Aamir Khan forgets dialogues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.