बघा, युवी-हेजेलचे pre-wedding shoot

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 19:46 IST2016-04-09T00:59:38+5:302016-04-08T19:46:56+5:30

ब्रिटीश मॉडेल हेजेल किच हिच्यासोबत युवराज सिंहची मैत्री आहे, हे सगळ्यांना ठाऊक होते. पण अचानक युवीने हेजेलसोबत एन्गेजमेंटची बातमी ...

See, UV-Hejel's pre-wedding shoot | बघा, युवी-हेजेलचे pre-wedding shoot

बघा, युवी-हेजेलचे pre-wedding shoot

रिटीश मॉडेल हेजेल किच हिच्यासोबत युवराज सिंहची मैत्री आहे, हे सगळ्यांना ठाऊक होते. पण अचानक युवीने हेजेलसोबत एन्गेजमेंटची बातमी देत, सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला होता. आता हे लव्ह बर्ड्स लग्नगाठीत अडकण्यास आतूर आहेत. अलीकडे या दोघांनी एका मॅगझीनसाठी प्री-वेडिंग फोटोशूट केले. या फोटोशूटसोबत या दोघांनी आपल्या लव्हस्टोरी बाबतची अनेक गुपितेही यावेळी शेअर केली. युवीने तुला कसे प्रपोज केले, असा प्रश्न हेजेलला विचारण्यात आला. यावर  बाली येथे एका रोमॅन्टिक डिनरवर, असे एका दमात हेजेल बोलून गेली. सर्व कपलप्रमाणेच हेजेल व युवीलाही एकमेकांमधील काही गुण, काही सवयी आवडत नसतील. याबाबत विचारल्यावर युवीने अतिशय प्रामाणिक पण ‘इशारों इशारों में’उत्तर दिले, तुम्ही स्वत:चा निर्णय स्वत: घेत असाल तर कधीही चांगले, असे तो म्हणाला. आता पाळी होती, हेजेलची. तिला युवी मधली कुठली गोष्ट आवडत नाही, तर युवी तिला अगदी लास्ट मुव्हमेंटला कुठे जायचे असले तर सांगतो आणि मग तयारीला लागणाºया वेळेवरून चिडतो,असे ती म्हणाली.
हेजेल व युवी दोघेही लग्नाचे प्लॅनिंग करताहेत. तुमच्या दोघांचे बेस्ट मॅन आणि ब्राईड मेड्स कोण असेल, या प्रश्नावर युवी खळखळून हसला. मला माझे चॉईस नाही. कारण अंगद बेदीने स्वत:ला माझा बेस्ट मॅन निवडले आहे, असे त्याने सांगितले. हेजेलने मात्र तिची बहीण टीना आणि बेस्ट फ्रेन्ड ब्रूना अब्दुल्ला व इन्शीया लेसवाला यांना तिच्या ब्राईडमेड्स निवडले आहे.




.............................................................


​युवराजने ठेवले हेजलचे नवे नाव!

आॅल राऊंडर क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची मंगेतर हेजेल कीच म्हणजे क्यूट कपल. प्रेमाच्या आणाभाका घेत, हे कपल आता नव्या प्रवासाला निघाले आहे आणि लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. सध्या या क्यूट कपलचे प्रेम चांगलचे बहरात आहे. दोघांच्याही टिष्ट्वटर अकाऊंटवरून त्याची कल्पना यावी...युवराज व हेजेलच्या अकाऊंटवरून आणखी एक गोष्ट आम्हाला कळलीय...ती म्हणजे, युवराज हेजेलला प्रेमाने काय बोलवतो, ती! बेबी, बू, बा...नो..नो...असे नाही. जाणून घ्यायचे तर त्यांचे हे पोस्ट वाचा.
 

Wow, you're good looking! I guess i should get my glasses lenses with the same 16 MP!

 

@hazelkeech haha thanks ketchup it's the phone camera that makes you look good 

पोस्ट वाचतेतं. युवी हेजेलला  प्रेमाने ‘केचअप’ बोलवतो. आहे ना मज्जा...केचअप..व्वा!!

Web Title: See, UV-Hejel's pre-wedding shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.