SEE PIX: अखेर श्रीदेवीने केला मुलीच्या बॉयफ्रेंडचा स्वीकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 11:16 IST2017-02-19T05:38:36+5:302017-02-19T11:16:31+5:30

जान्हवी कपूरच्या ‘खुल्लमखुल्ला प्यार’ करण्यामुळे तिची आई श्रीदेवी नाराज असल्याची सांगितले जायचे. मात्र, मुलीच्या प्रेमा खातर का होईना परंतु श्रीदेवीने मुलीच्या बॉयफ्रेंडचा स्वीकार केल्याचे दिसतेय. सध्या सोशल मीडियावर बोनी कपूर, श्रीदेवी, जान्हवी आणि अक्षत यांचा एकत्र फोटो फिरत आहे.

SEE PIX: Did Sridevi accept daughter boyfriend after all? | SEE PIX: अखेर श्रीदेवीने केला मुलीच्या बॉयफ्रेंडचा स्वीकार?

SEE PIX: अखेर श्रीदेवीने केला मुलीच्या बॉयफ्रेंडचा स्वीकार?

रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली असून येणाऱ्या काळात लवकरच ती बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून दाखल होणार आहे. परंतु त्याआधीच तिच्या रिलेशिनशिपमुळे ती चर्चेत आहे. जान्हवी आणि तिचा बॉयफे्रंड अक्षत रंजन अनेक कार्यक्रमांना एकत्र दिसतात.

जान्हवीच्या अशा ‘खुल्लमखुल्ला प्यार’ करण्यामुळे तिची आई श्रीदेवी नाराज असल्याची सांगितले जायचे. मात्र, मुलीच्या प्रेमा खातर का होईना परंतु श्रीदेवीने मुलीच्या बॉयफ्रेंडचा स्वीकार केल्याचे दिसतेय. सध्या सोशल मीडियावर बोनी कपूर, श्रीदेवी, जान्हवी आणि अक्षत यांचा एकत्र फोटो फिरत आहे.

                                       Janhavi Akshat

हा फोटो पाहून कोणीही म्हणेल की, अक्षत आता कपूर फॅमिलीचा सदस्य झाला आहे. गेल्या वर्षी अक्षत, श्रीदेवी आणि जान्हवी हे तिघे ‘डिअर जिंदगी’च्या प्रीमियरसाठी एकाच कारमध्ये आले होते. श्रीदेवीचा मुलीच्या बॉयफ्रेंडसोबतचा वावर पाहता तिने त्याचा स्वीकार केल्याचे स्पष्ट होते.

मध्यंतरी श्रीदेवीने जान्हवीला सोशल मीडियावर त्यांचे सेल्फी टाकण्यावरून खडसावले होते. मुलीचे असे बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करणे मुळीच आवडत नव्हते. म्हणून श्रीदेवीने तिला काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगितले होते.

सुरुवातीला अक्षतला चुकीने सुशिलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया समजले जायचे. काही काळासाठी शिखर आणि जान्हवी रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे किस करतानाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु सध्या जान्हवी केवळ अक्षतला डेट करीत असून दोघे एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडालेले आहेत असेच वाटते. नुकतेच मनीष मल्होत्रानेदेखील या दोघांचा डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

ALSO READ: जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फॅशन सेन्सनी केली निराशा!
 

Web Title: SEE PIX: Did Sridevi accept daughter boyfriend after all?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.