See Pics : श्याम प्रसाद रेड्डींच्या मुलीच्या लग्नात पोहोचला बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 21:50 IST2017-07-28T16:20:31+5:302017-07-28T21:50:31+5:30

नुकतेच श्याम प्रसाद रेड्डी यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पाडला. हा सोहळा पुढील कित्येक काळ स्मरणात राहील असा झाला. ...

See Pics: Shyam Prasad reached Reddy's daughter's wedding, Bahubali Prabhas and Dev Saena Anushka Shetty! | See Pics : श्याम प्रसाद रेड्डींच्या मुलीच्या लग्नात पोहोचला बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टी!

See Pics : श्याम प्रसाद रेड्डींच्या मुलीच्या लग्नात पोहोचला बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टी!

कतेच श्याम प्रसाद रेड्डी यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पाडला. हा सोहळा पुढील कित्येक काळ स्मरणात राहील असा झाला. कारण लग्न सोहळ्यात टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यातही दस्तुरखुद्द बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टी यांनी हजेरी लावल्याने सोहळ्याची रंगत बघण्यासारखी होती. या दोघांनी नवविवाहितांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 



गेल्या गुरुवारी हैदराबाद येथील एन. कन्वेंशन येथे हा सोहळा आयोजित केला होता. सोहळ्यात अल्लु अर्जुन, वेंकटेश, पवन कल्याण यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनुष्का शेट्टी अगदीच साध्या साडीमध्ये पोहोचली होती. तर प्रभासही साध्या लूकमध्येच आला होता; मात्र अशातही या दोघांनी सोहळ्यातील संपूर्ण वातावरण बदलून टाकले. परंतु या दोघांची भेट होऊ शकली नाही; मात्र हे दोघे एकमेकांना का भेटले नाहीत, यावरून आता चर्चा रंगत आहे. पण काहीही असो, दोघांच्या उपस्थितीमुळे या लग्न सोहळ्यात चार चॉँद लागले हे निश्चित. 



दरम्यान, या दोन्ही कलाकारांच्या प्रोफेशन लाइफविषयी बोलायचे झाल्यास, प्रभास लवकरच त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर अनुष्कानेही एक तेलगू चित्रपट साइन केला असून, त्यावर ती काम करीत आहे. सुरुवातीला असे बोलले जात होते की, प्रभास आणि अनुष्का पुन्हा एकदा ‘साहो’मध्ये एकत्र येणार आहेत. परंतु अनुष्काच्या वाढत्या वजनामुळे तिचा ‘साहो’मधून पत्ता कट करण्यात आला असून, तिच्या जागी पूजा हेगडे हिच्या नावाची चर्चा आहे. 



या चित्रपटासाठी जर पूजाचे नाव निश्चित झाले तर प्रभास आणि पूजा पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. शिवाय प्रभाससोबतची तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल काय? ती अनुष्काची जागा घेऊ शकेल काय? असे अनेक प्रश्न सध्या अनुष्का आणि प्रभासच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. 







 

Web Title: See Pics: Shyam Prasad reached Reddy's daughter's wedding, Bahubali Prabhas and Dev Saena Anushka Shetty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.