SEE PICS : ...पहा तैमूर अली खानचा नवाबी अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 13:53 IST2017-07-11T08:00:58+5:302017-07-11T13:53:08+5:30

अभिनेता सैफ अली खान एक अभिनेता असण्याबरोबरच त्याच्या नवाबी अंदाजालाही ओळखला जातो. त्याच्या देहबोलीवरून तो पतौडी परिवारातील नवाब असल्याचे ...

SEE PICS: ... See Taimur Ali Khan's new word !! | SEE PICS : ...पहा तैमूर अली खानचा नवाबी अंदाज!!

SEE PICS : ...पहा तैमूर अली खानचा नवाबी अंदाज!!

िनेता सैफ अली खान एक अभिनेता असण्याबरोबरच त्याच्या नवाबी अंदाजालाही ओळखला जातो. त्याच्या देहबोलीवरून तो पतौडी परिवारातील नवाब असल्याचे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता असाच काहीसा अंदाज त्याच्या लाडक्या चिमुकल्या तैमूरमध्ये बघावयास मिळत आहे. तैमूर जसा मोठा होत आहे, तसा त्याच्यातील नवाबी अंदाज स्पष्टपणे दिसून येत आहे. तैमूूूर अली खानचा असाच नवाबी अंदाज दाखविणारा एक फोटो सध्या व्हायरल होत असून, त्याचा हा फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. 



या फोटोमध्ये तैमूर पांढरा कुर्ता आणि पायजामा घालून बसलेला दिसत आहे. तैमूरचा हा नवाबी अंदाजातील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तैमूरचा हा फोटो व्हायरल होतात सैफ आणि करिनाच्या चाहत्यांनी सैफ आणि करिनाचा नवाबी अंदाजातील फोटो तैमूरच्या फोटोबरोबर एडिट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिघेही पांढºया रंगाच्या ड्रेसमध्ये बघावयास मिळत असून, त्यातील तैमूरचा अंदाज बघण्यासारखा आहे.  



काही दिवसांपूर्वीच तैमूरची आजी बबिताच्या घरातून बाहेर पडतानाचे काही स्टायलिश फोटोज् समोर आले होते. फोटोमध्ये तैमूर खूपच स्टायलिश दिसत होता. पांढºया रंगाचे टी-शर्ट आणि शूज त्याला खूपच शोभून दिसत होते. तैमूरचा हा फोटो पुढे आल्यानंतर लगेचच त्याच्या टी-शर्ट आणि शूजच्या किमतीवरही चर्चा रंगू लागली. खरं तर तैमूर जन्मापासून माध्यमांच्या अग्रस्थानी राहिला आहे. त्याची प्रत्येक झलक चर्चेचा विषय ठरत असते. शिवाय इंटरनेटवरदेखील त्याचे फोटोज् मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात.  



तैमूरचा जन्म गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता. जन्मताच हॉस्पिटलमधून त्याचे काही फोटोज् व्हायरल झाले होते. त्यानंतर ‘तैमूर’ या नावावरूनही चांगलेच वादंग उठले होते. मात्र आज तैमूर चाहत्यांचा लाडका बनला आहे. काही दिवसांपूर्वीच मम्मी करिना कपूर-खानने तैमूरची दृष्ट काढणाºया एका किन्नरला ५१ हजार रुपये दिले होते. 

Web Title: SEE PICS: ... See Taimur Ali Khan's new word !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.