See Pics : ट्रॅडिशनल लूकमध्ये सारा अली खान दिसतेय ‘लाजवाब’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 19:11 IST2017-07-26T13:41:08+5:302017-07-26T19:11:08+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक साराच्या ...

See Pics: Sarah Ali Khan looks fantastic in a trendy look! | See Pics : ट्रॅडिशनल लूकमध्ये सारा अली खान दिसतेय ‘लाजवाब’!!

See Pics : ट्रॅडिशनल लूकमध्ये सारा अली खान दिसतेय ‘लाजवाब’!!

लिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक साराच्या बॉलिवूड डेब्यूवरून मधल्या काळात प्रचंड चर्चा रंगली होती; मात्र आता या चर्चांना पूर्णविराम बसला असून, ती एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, नुकताच डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये सारासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते; मात्र सगळ्यांच्याच नजरा सारावर होत्या. 





साराने ट्रॅडिशनल अवतारात एंट्री करून अनेकांना चकित केले. तिच्या या ट्रॅडिशनल लूकमुळे ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. हा फॅशन शो दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सारा आई अमृतासह उपस्थित होती. लहंगा परिधान केलेली सारा या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा साराकडे होत्या. या फॅशन शोमध्ये श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांनीही हजेरी लावली होती. 





वास्तविक या अगोदरदेखील सारा ट्रॅडिशनल अंदाजात बघावयास मिळालेली आहे. परंतु यावेळेस तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता. यावेळचा साराचा अंदाज कौतुकास्पद होता. शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर हिचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. ती या शोची शो-स्टॉपर होती. दरम्यान सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. या अगोदर ती निर्माता करण जोहर याच्या ‘स्टुडंट आॅफ द इअर-२’ या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची चर्चा होती. 





परंतु आई अमृताच्या सागण्यावरून तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यू करण्याचे ठरविले. त्यामुळे करणने साराचा पत्ता कट केला असून, तिच्या जागी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिला तो संधी देणार असल्याचे समजते. दरम्यान, सारा सध्या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारा चेहरा आहे. 

Web Title: See Pics: Sarah Ali Khan looks fantastic in a trendy look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.