SEE PICS : Priyanka Nick Wedding: प्रियांका व निक जोधपूरमध्ये दाखल, आज रंगणार मेहंदी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 10:47 IST2018-11-29T10:47:22+5:302018-11-29T10:47:53+5:30
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे विधी आज गुरुवारपासून सुरू होत आहे. आज प्रियांका व निकची मेहंदी सेरेमनी आहे.

SEE PICS : Priyanka Nick Wedding: प्रियांका व निक जोधपूरमध्ये दाखल, आज रंगणार मेहंदी!!
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे विधी आज गुरुवारपासून सुरू होत आहे. आज प्रियांका व निकची मेहंदी सेरेमनी आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका व निक दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्याकडे अख्ख्या चाहत्यांचे लक्ष लागले असताना आज सकाळी प्रियांका व निक आपल्या १५ लोकांच्या टीमसह जोधपूरला रवाना झालेत.
प्रियांका व निक आपल्या कुटुंबासोबत एका चार्टड प्लेनने रवाना झालेत.
यानंतर प्रियांकाची आई मधू चोप्रा याही जोधपूरला रवाना झाल्यात. रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर प्रियांका व निक दोघांनीही मीडियाला हसत हसत पोज दिल्यात.
निक आणि प्रियांका दोघेही आपल्या आयुष्यातील या खास प्रसंगी कमालीचे उत्सूक दिसले.
निक हसत हसत कॅमेऱ्यांना सामोरा गेला. तर प्रियांकाने हात जोडून मीडियाला अभिवाद केले.
जोधपूरला रवाना होण्यापूर्वी काल प्रियांकाच्या घरी गणेश पुजेचे आयोजन केले गेले होते. यावेळी प्रियांकासह निक व निकचे संपूर्ण कुटुंब पारंपरिक पेहरावात दिसले. प्रियांका व निक येत्या २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लग्नात सामील होणाºया पाहुण्यांना प्रियांका व निक एक खास भेट देणार आहेत. होय, या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक व प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसºया बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल. वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे वºहाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे.