SEE PICS : राणा दग्गुबतीसोबत करण जोहरच्या पार्टीत पोहोचला प्रभास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 10:33 IST2017-06-20T05:01:05+5:302017-06-20T10:33:33+5:30
‘बाहुबली : दी कनक्लुजन’ अर्थात ‘बाहुबली2’नंतर प्रभास आणि राणा दग्गुबती सगळ्यात लोकप्रीय साऊथ स्टार झालेत. काल रात्री प्रभास अचानक ...
.jpg)
SEE PICS : राणा दग्गुबतीसोबत करण जोहरच्या पार्टीत पोहोचला प्रभास!
‘ ाहुबली : दी कनक्लुजन’ अर्थात ‘बाहुबली2’नंतर प्रभास आणि राणा दग्गुबती सगळ्यात लोकप्रीय साऊथ स्टार झालेत. काल रात्री प्रभास अचानक मुंबई एअरपोर्टवर दिसला. त्याला अचानक असे मुंबई विमानतळावर पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. अखेर मुंबईत प्रभास काय करतोय, असा विचार सगळ्यांच्या मनात आला. पण काही तासांत प्रभास मुंबई का आला, त्याचे उत्तर मिळाले. प्रभास करण जोहरच्या पार्टीसाठी खास मुंबईत आला. काल रात्री करणने पार्टी दिली. या पार्टीत प्रभास राणा दग्गुबतीसोबत पोहोचला.
![]()
![]()
![]()
खरे तर प्रभास अजिबात पार्ट्यांना जात नाही. काहीसा लाजाळू, काहीसा आपल्याच कोशात वावरणारा प्रभास लंडनमध्ये आयोजित केलेल्या ‘बाहुबली2’च्या सक्सेस पार्टीलाही पोहोचला नव्हता. या पार्टीला जाण्यापेक्षा प्रभासने अमेरिकेत एकट्याने वेळ घालवणे पसंत केले होते. पण काल प्रभास करण जोहरच्या घरी पार्टीला पोहोचला. निश्चितपणे करणच्या पार्टीला त्याने ‘चार चाँद’ लावलेत.
![]()
![]()
![]()
![]()
करणच्या या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. वरूण धवन, पुनीत मल्होत्रा, अर्जुन कपूर, आदित्य राय कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा अशी यंग गँगही याठिकाणी दिसली. आता अशात ही पार्टी किती रंगली असेल, हे सांगायला नकोच.
प्रभास लवकरच ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा बजेट तब्बल १५० कोटी रुपयांचा असल्याचे कळतेय. या वर्षा अखेरपर्यंत प्रदर्शित होणारा हा चित्रपट तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. येत्या काळात प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार अशीही चर्चा सध्या रंगते आहे. करण जोहरसह रोहित शेट्टी प्रभासला घेऊन चित्रपट काढण्यात उत्सूक असल्याची बातमी कालपरवाच आली. अर्थात रोहितने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे.