SEE PICS : सोशल मीडियावरील कॅटरिना कैफचा फनी लूक तुम्ही बघितला काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 18:03 IST2017-08-03T12:21:35+5:302017-08-03T18:03:52+5:30
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या भलतीच चर्चेत आहे. कधी तिच्या एक्स बॉयफ्रेंड सलमान खानवरून तर कधी तिच्या आगामी चित्रपटांवरून ती ...

SEE PICS : सोशल मीडियावरील कॅटरिना कैफचा फनी लूक तुम्ही बघितला काय?
अ िनेत्री कॅटरिना कैफ सध्या भलतीच चर्चेत आहे. कधी तिच्या एक्स बॉयफ्रेंड सलमान खानवरून तर कधी तिच्या आगामी चित्रपटांवरून ती माध्यमांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित करीत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही सध्या कॅटचा बोलबाला बघावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर आलेल्या कॅटने आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणारे फोटो शेअर करून चाहत्यांना आपलेसे केले आहे. आता असाच काहीसा मात्र फनी अंदाजातील फोटो शेअर करून कॅट चर्चेत आली आहे.
![]()
फोटोमध्ये कॅट भलत्याच मूडमध्ये बघावयास मिळत आहे. एका फोटोत ती थोडीसी लेझी दिसत आहे, तर दुसºया फोटोत तिचा फोकस कॅमेºयाकडे नसून डाव्या बाजूने दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये कॅट खूपच क्यूट दिसत असून, तिच्या या अदा घायाळ करणाºया आहेत. कॅटने हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून त्यास प्रचंड प्रमाणात लाइक्स आणि कमेण्ट दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅटने बिकीनी फोटो शेअर करून धूम उडवून दिली होती. आता पुन्हा कॅटने फनी अंदाजातील हे फोटो शेअर केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये काहीसे उत्साहाचेच वातावरण म्हणावे लागेल.
![]()
असो, सध्या कॅट तिच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सिक्वल आहे. त्याचबरोबर ती शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर आनंद एल. रॉय यांच्या आगामी चित्रपटातदेखील काम करीत आहे. तसेच कृष्ण आचार्या यांच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात करणार आहे. या चित्रपटात ती आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. तिन्ही खानसोबत सलग चित्रपट करण्याची कॅटला संधी मिळत असल्याने ती प्रचंड खूश आहे. हे सर्व बिग बजेट चित्रपट असल्याने कॅट पुन्हा एकदा तिच्या यशस्वी ट्रॅकवर परतण्याची शक्यता आहे. या चित्रपटांमधून कॅटला प्रचंड अपेक्षा आहेत.
ALSO READ : कॅटरिना कैफने इन्स्टावर शेअर केला रेड बिकिनीतील सिजलिंग फोटो!!