SEE PICS : ‘ही’ आहे बॉलिवूडची नवी चुलबुली गर्ल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 15:21 IST2017-08-17T09:51:51+5:302017-08-17T15:21:51+5:30
‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या खास स्टाइलने चाहत्यांना ...

SEE PICS : ‘ही’ आहे बॉलिवूडची नवी चुलबुली गर्ल!
‘ ुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या खास स्टाइलने चाहत्यांना आपलीशी करणारी निधी सध्या विविध पार्ट्या तसेच इव्हेंटमध्ये बघावयास मिळत आहे. आपल्या खास अंदाजमुळे निधी चाहत्यांच्या मनात बसत असून, तिचा नटखट अंदाज तिला बॉलिवूडची नवी चुलबुली गर्ल अशी ओळख मिळवून देत आहे.
![]()
![]()
अभिनेत्री आलिया भट्ट हिला बॉलिवूडची चुलबुली गर्ल म्हणून ओळखले जाते. कारण आलियाची स्टाईल आणि तिचा अंदाज या उपाधीला समर्पक आहे. आता असाच अंदाज आणि स्टाइल निधी अग्रवाल या नवोदित अभिनेत्रीमध्येही बघावयास मिळत आहे. हसमुख, चंचल, चुलबुली निधी याच स्वभावामुळे आज चाहत्यांना भावत आहे. शिवाय तिच्या चाहत्यांच्या संख्येमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या बुधवारी जेव्हा रात्री उशिरा निधी मुंबईत स्पॉट झाली तेव्हा ती याच अंदाजात बघावयास मिळाली.
![]()
![]()
निधीने अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नसली तरी, निधीचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला. या चित्रपटातील निधीची डान्स स्टाइल कायम स्मरणात राहील, अशी होती. दरम्यान, निधी सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे काही फोटोज् चाहत्यांशी शेअर करीत असते. सोशल मीडियावरील तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे.