SEE PIC : ‘टायगर जिंदा है’मधील कॅटरिना कैफचा हा अॅक्शन अवतार तुम्हाला करेल घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 21:44 IST2017-06-16T16:14:31+5:302017-06-16T21:44:31+5:30
बॉलिवूडची हॉट गर्ल कॅटरिना कैफ आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना बघावयास मिळणार आहे. सलमान खान ...
SEE PIC : ‘टायगर जिंदा है’मधील कॅटरिना कैफचा हा अॅक्शन अवतार तुम्हाला करेल घायाळ!
ब लिवूडची हॉट गर्ल कॅटरिना कैफ आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना बघावयास मिळणार आहे. सलमान खान स्टारर या चित्रपटाची सध्या मोरक्को येथे शूटिंग सुरू असून, सध्या तिच्यावर अॅक्शन स्टंटचे सीन्स शुट केले जात आहेत. यातील काही फोटोज् समोर आले असून, त्यात कॅटरिनाचा अंदाज बघण्यासारखा आहे.
![]()
यशराज फिल्म अंतर्गत बनविल्या जात असलेल्या या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्सचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये कॅटरिना गुंडांसोबत दोन हात करताना बघावयास मिळत आहे. वास्तविक कॅटने याच चित्रपटाच्या पहिल्या ‘एक था टायगर’मध्ये जबरदस्त अॅक्शन केली होती. त्यामुळे दुसºया भागातही तिच्याकडून अशाच प्रकारचे अॅक्शन सीन्स करून घेण्याचे निर्मात्यांनी ठरविले आहे. त्यासाठी तिला विशेष ट्रेनिंगही दिले जात आहे.
![]()
रिपोर्टनुसार कॅटरिनाला एका हॉलिवूड स्टंट डायरेक्टरकडून ट्रेनिंग दिले जात आहे. कॅट या स्टंटला चांगला रिस्पॉन्स देत असल्याने चित्रपटात तिचा भारदस्त अवतार बघावयास मिळण्याची शक्यता आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट पूर्णत: अॅक्शनपट आहे. सध्या या चित्रपटाची मोरक्को येथे शूटिंग सुरू असून, सलमानही याठिकाणी पोहोचला आहे. वास्तविक सध्या या दोघांचेही अतिशय व्यस्त शेड्यूल्ड आहे. कारण दोघांचेही ‘ट्यूबलाइट’ आणि ‘जग्गा जासूस’ हे चित्रपट रिलीज होणार असल्याने त्याच्या प्रमोशनची जबाबदारी सांभाळून त्यांना ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगसाठी वेळ द्यावा लागत आहे.
![]()
दरम्यान, आतापर्यंत सलमान कॅटची जोडी, ‘एक था टायगर’, ‘युवराज’, ‘मैने प्यार क्यों किया’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटात झळकली आहे. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असलेले या जोडप्यांची काही वर्षांपूर्वीच ब्रेकअप झाले आहे. परंतु त्यांच्यातील नाते अजूनही कायम असल्याचे या चित्रपटानिमित्त दिसून येत आहे.