पाहा शाहरुखच्या मुलीचे हे फोटो होत आहेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 15:58 IST2016-12-19T15:58:15+5:302016-12-19T15:58:15+5:30
शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडच्या मोस्ट फेव्हरेट स्टार किड्सपैकी एक आहे. सुहाना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असून नेहमीच तिचे ...

पाहा शाहरुखच्या मुलीचे हे फोटो होत आहेत व्हायरल
श हरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडच्या मोस्ट फेव्हरेट स्टार किड्सपैकी एक आहे. सुहाना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असून नेहमीच तिचे फोटोज शेअर करत असते. अलीकडेच इन्स्टाग्रामवर पोस्ट सुहानाने तिचा एक फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. या फोटोत सुहाना सनलाइटमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. २२ मे २००० रोजी जन्मलेली सुहाना आता १६वर्षांची आहे.
सुहानाला व्हायचे आहे अॅक्ट्रेस...
गेल्यावर्षी एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते, की त्याची मुलगी सुहाना अभिनेत्री होऊ इच्छिते. इतकेच नाही तर, सुहानाने काजोलकडून अभिनयातील बारकावे शिकावे, असेही शाहरुख म्हणाला.
डान्सिंग आणि स्पोर्ट्सची आहे सुहानाला आवड...
मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणा-या सुहानाला डान्सिंग आणि स्पोर्ट्सची विशेष आवड आहे. शाळेच्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सुहाना आवर्जुन सहभागी होत असते. मात्र सुहानाने उत्कृष्ट नृत्यांगणा होऊन जगभरात नाव कमवावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. सुहाना स्टेट लेव्हल ताइक्वांडो चॅम्पिअनशिपमध्ये सहभागी झाली आहे. शिवाय शाळेच्या टीमकडून ती फुटबॉलही खेळत.
शाहरुख-गौरीची लाडकी आहे सुहाना...
शाहरुख खानने अनेकदा सुहानाविषयीचे त्याचे अफेक्शन जाहिर केले आहे. एका इव्हेंटमध्ये तर शाहरुखने कबुली दिली होती, की तो त्याच्या लेकीला अतिशय घाबरतो. सुहाना अतिशय समजुतदार असून चुकीचे काम केल्यावर टोकत असल्याचे शाहरुख सांगतो. शाहरुख सुहानाला बालपणापासूनच त्याच्या सिनेमाच्या सेटवर सोबत घेऊन जातो. वडिलांप्रमाणेच सुहाना तिच्या आईचीही लाडकी आहे. अनेकदा आई-मुलीची जोडी इव्हेंटमध्ये एकत्र दिसत असते.