पाहा आता कशी दिसते दामिनी या चित्रपटाची नायिका मिनाक्षी शेक्षाद्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 16:26 IST2017-11-01T10:56:41+5:302017-11-01T16:26:41+5:30
मिनाक्षी शेक्षाद्रीने गेल्याच वर्षी घायल वन्स अगेन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती खास काही दिवस ...

पाहा आता कशी दिसते दामिनी या चित्रपटाची नायिका मिनाक्षी शेक्षाद्री
म नाक्षी शेक्षाद्रीने गेल्याच वर्षी घायल वन्स अगेन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती खास काही दिवस भारतात आली होती. पण आता ती पुन्हा अमेरिकेला तिच्या कुटुंबियांसोबत राहात आहे. मिनाक्षीचे नवीन काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून मिनाक्षीमध्ये किती बदल झाला आहे हे आपल्याला कळून येत आहेत. या फोटोतील व्यक्ती खरेच मिनाक्षी आहे का हा देखील प्रश्न सगळ्यांना पडत आहे.
मिनाक्षी शेक्षाद्री नव्वदीच्या काळात अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमध्ये तिचे वाढलेले वय दिसून येत आहे. मिनाक्षीने अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. एक अभिनेत्री व्हायच्या आधी तिने मिस इंडिया हा किताब मिळवला होता. तिचे खरे नाव हे शशिकला शेषाद्री असून मिस इंडिया बनल्यानंतर तिचे फोटो सगळ्या वर्तमानपत्रात छापून आले होते. हे फोटो मनोज कुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तिला पेंटर बाबू या चित्रपटासाठी विचारले आणि अशाप्रकारे मिनाक्षीचा या बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला. पण शशिकला नावाची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने शशिकलाचे नाव बदलून मिनाक्षी ठेवण्यात आले. पेंटर बाबू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पण या चित्रपटामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. हिरो या चित्रपटाने तर तिचे करियर संपूर्णपणे बदलून गेले.
![meenakshi seshadri]()
बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये मिनाक्षीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर हरिश मैसूर या इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत लग्न केल्यानंतर मिनाक्षी न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली आणि त्यानंतर ती चित्रपटांमध्ये झळकलीच नाही. गेल्याच वर्षी घायल वन्स अगेन या चित्रपटात तिला अनेक वर्षांनी पाहायला मिळाले होते.
Also Read : मिनाक्षी शेक्षाद्रीमुळे या प्रसिद्ध बॉलिवूडच्या गायकाचा झाला होता घटस्फोट