​पाहा, प्रकाश राजच्या आवाजातील ‘मॉम’चे तामिळ मोशन पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 13:55 IST2017-04-07T08:25:47+5:302017-04-07T13:55:47+5:30

श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ बनणार, हे तुम्हाला माहितीच आहे. होय, लवकरच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा येतो आहे. केवळ हिंदीतच नाही तर तामिळ भाषेतही हा चित्रपट तयार होतो आहे. आज या सिनेमाच्या तामिळ व्हर्जनचे मोशन पोस्टर रिलीज झाले.

See, Mohan's Tamil Motion poster from Prakash Raj's voice! | ​पाहा, प्रकाश राजच्या आवाजातील ‘मॉम’चे तामिळ मोशन पोस्टर!

​पाहा, प्रकाश राजच्या आवाजातील ‘मॉम’चे तामिळ मोशन पोस्टर!

रीदेवी पुन्हा ‘मॉम’ बनणार, हे तुम्हाला माहितीच आहे. होय, लवकरच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा येतो आहे. केवळ हिंदीतच नाही तर तामिळ भाषेतही हा चित्रपट तयार होतो आहे. आज या सिनेमाच्या तामिळ व्हर्जनचे मोशन पोस्टर रिलीज झाले. या चित्रपटात श्रीदेवी एका आईच्या भूमिकेतच दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘मॉम’च्या हिंदी व्हर्जनचे मोशन पोस्टर आऊट झाले होते. या मोशन पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये नवाजुद्दीनचा आवाज होता. तामिळ व्हर्जनमध्ये साऊथ स्टार प्रकाश राज यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटाचे तामिळ टीजर येत्या रविवारी म्हणजे ९ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. श्रीदेवीच्या साऊथमधील चाहत्यांना यापेक्षा वेगळी ट्रिट काय बरे असू शकेल?


ALSO READ: Box Office..Big Clash : श्रीदेवी आणि श्रद्धा कपूरमध्ये टक्कर!

 अभिनेत्री श्रीदेवी सन २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. केवळ कुटुंब हेच तिचे जग असते. आता श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. अर्थात यातील तिची भूमिका ‘इंग्लिश विंग्लिश’मधील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटात श्रीदेवी हिच्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. श्रीदेवीचा लाडका हबी बोनी कपूर हा या चित्रपटाचा निर्माता आहे. तर रवि उदयवार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. केवळ श्रीदेवी, नवाजुद्दीन व अक्षय खन्नाचा दमदार अभिनयच नाही तर या चित्रपटाचा आणखी एक प्लस पॉईन्ट असणार आहे. हा प्लस पॉईन्ट आहे, एआर रहमान यांचे संगीत. येत्या जुलैमध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे.

Web Title: See, Mohan's Tamil Motion poster from Prakash Raj's voice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.