पाहा : मॉडर्न कटप्पा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 19:37 IST2016-08-20T14:07:05+5:302016-08-20T19:37:05+5:30
लवकरच मोठ्या पडद्यावर कटप्पाचा जुळा भाऊ पाहायला मिळणार आहे. थांबा...थांबा...आम्ही ‘बाहुबली २’बद्दल बोलत नाहीय. आम्ही बोलतोय ते ‘काशमूरा’ या ...

पाहा : मॉडर्न कटप्पा !
ल करच मोठ्या पडद्यावर कटप्पाचा जुळा भाऊ पाहायला मिळणार आहे. थांबा...थांबा...आम्ही ‘बाहुबली २’बद्दल बोलत नाहीय. आम्ही बोलतोय ते ‘काशमूरा’ या आगामी चित्रपटाबद्दल. आता तुमचा गोंधळ दूर केलाच पाहिजे. तर ‘काशमूरा’ एक मेगाबजट तामिळ चित्रपट आहे. यात अभिनेता कार्थी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कार्थी हा साऊथ स्टार सुरियाचा भाऊ आहे.‘काशमूरा’चे पहिले पोस्टर आले आणि कार्थी एकदम चर्चेत आला. कारण त्याचे या चित्रपटातील लूक एकदम ‘बाहुबली’तील कटप्पाशी मिळतेजुळते आहे. या पोस्टरमधील कार्थीला तुम्ही मॉडर्न कटप्पा म्हणू शकता, इतके यात साम्य आहे. कार्थीच्या टॅटूने त्याला मॉडर्न लूक दिले आहे. ‘काशमूरा’मध्ये कार्थीसोबत नयनथारा आणि श्री दिव्या सुद्धा दिसणार आहेत. हा एक फँटसी थ्रीलर चित्रपट आहे. आता कटप्पाचा जुळा भाऊ कार्थी यात काय रोमांचक करतो, ते बघूयात!!
![]()
![]()