पाहा : अशी आहे जॉन अब्राहमची २ कोटी किमतीची ‘गॉडजिला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 13:31 IST2017-01-01T13:31:28+5:302017-01-01T13:31:28+5:30

आता तुम्ही म्हणाल, ‘गॉडजिला’ म्हणजे नेमकं काय आहे? ज्यासाठी ‘धूम’ स्टार जॉन अब्राहम एवढा उत्सुक  आहे? होय, गॉडजिला म्हणजे ...

See: John Abraham worth 2 crore worth of 'Gossijila'! | पाहा : अशी आहे जॉन अब्राहमची २ कोटी किमतीची ‘गॉडजिला’!

पाहा : अशी आहे जॉन अब्राहमची २ कोटी किमतीची ‘गॉडजिला’!

ा तुम्ही म्हणाल, ‘गॉडजिला’ म्हणजे नेमकं काय आहे? ज्यासाठी ‘धूम’ स्टार जॉन अब्राहम एवढा उत्सुक  आहे? होय, गॉडजिला म्हणजे त्याची नवी महागडी कार. त्याने त्याच्या कारचे ‘गॉडजिला’ हे टोपण नाव ठेवले आहे. तब्बल २ कोटी रूपयांची ही कार असून तिचा फोटो तो चाहत्यांसोबत केव्हा शेअर करतो, अशी उत्सुकता त्याला लागली होती. अखेर त्याने ‘गॉडजिला’सोबत स्वत:चा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो आता सर्वत्र व्हायरल झाला आहे. 

                          

जॉन अब्राहमचे बाईक्सवरील प्रेम तर आपल्याला ठाऊकच आहे. ‘धूम’ चित्रपटानंतर जॉन अब्राहम आणि महागड्या बाईक्स असे जणू काही समीकरणच बनले होते. अशी एकही बाईक नसायची जी त्याने स्वत: ड्राईव्ह केलेली नाही. हे त्याचे प्रेम ‘फोर्स’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत होते. त्याने फोर्समध्ये १५० किग्रॅ.वजनाची बाईक उचलली होती. तर ‘फोर्स २’ मध्ये त्याने १५०० किगॅ्र. वजनाची ‘मर्सिडिज बेंझ’ उचलली होती. यावरूनच त्याचे बाईक्स आणि कारवरील प्रेम समजते. ‘फोर्स २’ नंतर मर्सिडिजच्या किंमती वाढल्या आणि त्यांना चांगलीच डिमांड आली. 

जॉनने खरेदी केलेल्या या कारच्या फोटोतून त्यातील अंतर्गत व्यवस्था अतिशय आकर्षक अशी असल्याचे दिसतेय. एअर कंडिशन आणि महागडी कार असल्याने चाहत्यांनाही ती आवडणार यात काही शंका नाही. जपानमध्ये या कारचे हँडमेड इंजिन बनवण्यात येते. सध्या तो अहमद खानच्या ‘हेराफेरी ३’ साठी शूटिंग करतोय. 

Web Title: See: John Abraham worth 2 crore worth of 'Gossijila'!