​SEE : अशी असेल झलकारीबाई! ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’मधील अंकिता लोखंडेचा लूक लीक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:46 IST2018-03-16T06:16:03+5:302018-03-16T11:46:03+5:30

‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’ या चित्रपटामुळे कंगना राणौत चर्चेत आहेत. पण आता अंकिता लोखंडे ही सुद्धा या ...

SEE: It is like that! Ankita Lokhande's look leak in Manikarnika: The Queen of Jhansi !! | ​SEE : अशी असेल झलकारीबाई! ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’मधील अंकिता लोखंडेचा लूक लीक!!

​SEE : अशी असेल झलकारीबाई! ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’मधील अंकिता लोखंडेचा लूक लीक!!

णिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’ या चित्रपटामुळे कंगना राणौत चर्चेत आहेत. पण आता अंकिता लोखंडे ही सुद्धा या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. होय, या चित्रपटातील अंकिताचा फर्स्ट लूक लीक झाला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची एक्स- गर्लफ्रेन्ड  अंकिता दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये संधीच्या शोधात होती. अखेर कंगनाने तिला ब्रेक दिला आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’ या चित्रपटात अंकिताची वर्णी लागली. हा अंकिताचा डेब्यू सिनेमा आहे. यात ती झलकारी बाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या याच लूकचा फोटो लीक झाला आहे. यात अंकिता महाराष्ट्रीय नऊवारीत अतिशय सुंदर दिसतेय. 



ALSO READ: OMG!! अंकिता लोखंडे म्हणते, मीच ‘मणिकर्णिका’ची हिरोईन!

 सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपले शौर्य आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते.   इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबार्इंना पकडले व फासावर लटकवले होते. झलकारीबार्इंची हीच शौर्यगाथा अंकिता पडद्यावर जिवंत करणार आहे.
  सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण २०१६ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते.  ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर भेटलेले हे लव्हबर्ड्स कधीकाळी वेगवेगळ्या वाटांना जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण तसे झाले. अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली होती. क्रिती सॅनन आयुष्यात आल्याने सुशांतने अंकिताला सोडले, अशीही चर्चा होती.  या ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरणे अंकितासाठी बरेच कठीण गेले. पण आता अंकिता या ब्रेकअपच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलीयं. 

Web Title: SEE: It is like that! Ankita Lokhande's look leak in Manikarnika: The Queen of Jhansi !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.