SEE HOT PIC : दिशा पटानीचा असा बोल्ड अंदाज तुम्ही कधी बघितला नसेल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 16:17 IST2017-05-13T10:47:01+5:302017-05-13T16:17:01+5:30

पहिल्याच ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री दिशा पटानी खºया अर्थाने तेव्हा ...

SEE HOT PIC: You have never seen a bold prediction of Patni !! | SEE HOT PIC : दिशा पटानीचा असा बोल्ड अंदाज तुम्ही कधी बघितला नसेल!!

SEE HOT PIC : दिशा पटानीचा असा बोल्ड अंदाज तुम्ही कधी बघितला नसेल!!

िल्याच ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री दिशा पटानी खºया अर्थाने तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिचे नाव अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी जोडले गेले. मात्र दिशाला टायगरमुळे नव्हे तर तिच्या कामामुळे ओळखले जावे, अशी तिची इच्छा असल्याने सातत्याने ती चर्चेत राहण्यासाठी काही तरी कारनामा करीत असते. अर्थात यासाठी ती प्रचंड मेहनत करीत असल्याचेही समजते. 



वास्तविक दिशा जे काम अगदी मनापासून करते त्यात ती यशस्वी होताना दिसून येत आहे. शिवाय तिचा फॅन क्लबही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ती खूश आहे. असो, आज आम्ही तुम्हाला दिशा गेल्या काही दिवसांपासून कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे, याविषयी सांगणार आहोत. दिशाचे काही स्विमसूट फोटोज् सध्या व्हायरल होत असून, फोटोमधील दिशाचे सौंदर्यं बघून तिचे फॅन्स अक्षरश: घायाळ झाले आहेत. हे फोटो बघून एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल ती म्हणजे दिशाने हॉटनेसची परिभाषाच बदलली आहे. 



डिझायनर पिंक स्विमसूट दिशा एवढी सुंदर दिसत आहे की, बघणारे थक्क होत आहेत. कारण तिचा कातिलाना लुक्स, मोकळे केस अन् तेवढीच फिट बॉडी बघणाºयाला घायाळ करणारी आहे. यापेक्षा या फोटोंमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दिशाची स्माइल होय. तिची क्यूट स्माइल थेट बघणाºयाच्या हृदयावर निशाणा साधते. ज्या फोटोग्राफरने दिशाचे हे फोटोज् काढले त्या फोटोग्राफरचे फॅन्स आभार मानणार नसतील तरच नवल. कारण त्या फोटोग्राफरमुळेच दिशाचे हे सौंदर्यं त्यांना बघता आले. 



जर दिशाच्या प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास तर ती नुकतीच जॅकी चॅन यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात झळकली होती. तसेच ती सध्या एका प्रोजेक्टवर विचार करीत असून, त्याच्या स्क्रिप्टचे वाचन करीत आहे. सूत्रानुसार लवकर ती याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. अशी चर्चा होती की, दिशा टायगर श्रॉफ याच्या ‘स्टूडेंट आॅफ द इयर-२’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. मात्र आता या चर्चांवर पूर्णविराम देण्यात आला आहे. 

Web Title: SEE HOT PIC: You have never seen a bold prediction of Patni !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.