/>मागील काही दिवसापासून चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच लीक होण्याचे प्रकार वाढले आहे. मंगळवारी इम्रान हाश्मीचा ‘राज रीबूट’ हा चित्रपटही आॅनलाईन लिक झाला आहे. हा चित्रपट १६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपट लीक झाल्यानंतर इम्रान हाश्मी ट्विटरवर म्हणाला की, पायरेसीच्या विरोधात सर्वांनी एकत्रीत यावे. ट्विटरचा वापर मी चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी करतो. या माध्यमातून सहजरित्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहता येते. एक चित्रपट तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. चाहत्यांचे मनोरंजन व्हावे, याकरिता अनेकजण मेहनत घेत असतात. मागील अनेक दिवसापासून चित्रपट लीक होण्याचे प्रकार वाढले आहेत. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तो इंटरनेंटवर लीक होत आहे. याप्रकारामुळे मी कुणाला दोष देणार नाही. परंतु, प्रेक्षकांनी चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघावा. शाहीद कपूरचा ‘उडता पंजाब, सलमान खानचा ‘सुल्तान’, रितेश देशमुखचा ‘ग्रेंट ग्रैंड मस्ती’ हे चित्रपटही लीक झाले होते.