लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजय देवगणने काजोलला फटकारले होते, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:12 IST2017-10-08T10:41:12+5:302017-10-08T16:12:05+5:30

बॉलिवूडमधील बेस्ट कपलपैकी एक म्हणून अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांना ओळखले जाते. ‘प्यार तो होना ही था, हलचल, ...

On the second day of marriage, Ajay Devgn had reprimanded Kajol, but why? | लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजय देवगणने काजोलला फटकारले होते, पण का?

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजय देवगणने काजोलला फटकारले होते, पण का?

लिवूडमधील बेस्ट कपलपैकी एक म्हणून अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांना ओळखले जाते. ‘प्यार तो होना ही था, हलचल, इश्क, गुंडाराज आणि दिल क्या करे’ या चित्रपटांमध्ये ही जोडी प्रेक्षकांना खूपच पसंत आली होती. ‘हलचल’ या चित्रपटादरम्यान काजोलने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने अजयबाबत अनेक खुलासे केले. काजोलने म्हटले होते की, ‘पहिल्या भेटीत आम्ही एकमेकांना एवढे पसंत केले नव्हते.’ त्यावेळी अजयचे नाव अभिनेत्री करिष्मा कपूर हिच्याशी जोडले जात होते. करिष्मा त्यावेळी स्ट्रगल अभिनेत्री होती. परंतु अजयला ती खूपच भावली होती. अजय तिला डेट करीत होता. तर अजयकडे एक यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जात होते. तेव्हा अजय आणि करिष्माच्या लव्हस्टोरीमध्ये काजोलची एंट्री झाली. पुढे अजयदेखील हळूहळू काजोलकडे आकर्षित होत गेला. ही बाब जेव्हा करिष्माच्या लक्षात आली तेव्हा तिने अजयपासून दूर जाणे पसंत केले. तर दुसरीकडे काजोल आणि अजयच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. 



पुढे १९९९ मध्ये काजोल आणि अजय देवगण विवाहाच्या बंधनात अडकले. परंतु लग्नाच्या दुसºयाच दिवसापासूनच अजयने त्याच्या बेटर हाफ काजोलला फटकारायला सुरुवात केली. याबाबतचा खुलासा काजोलनेच तिच्या मुलाखतीदरम्यान केला होता. काजोलने म्हटले की, ‘अजयने लग्नाच्या दुसºयाच दिवशी मला कुठल्यातरी विषयावरून फटकारले होते.’ वास्तविक काजोल एक बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती कुठलीच गोष्ट मनात ठेवत नाही. तिच्याशी घडलेला कुठलाही किस्सा ती जाहीरपणे बोलण्यात कधीच मागे सरत नाही. 



काजोल जेव्हा एखाद्या पार्टी अथवा इव्हेंटमध्ये जाते तेव्हा तिला जर एखादी गोष्ट खटकली तर ती त्याविषयी बोलायला कधीच मागे सरत नाही. यामुळे बºयाचदा तिला अजयचे खडेबोल ऐकावे लागले. काजोलचा हा स्वभाव अजयला फारसा पटत नसल्याने तो तिला नेहमीच याविषयावरून सुनावत असल्याचे तिने म्हटले होते. हेच कारण असावे की, काजोलने केवळ पती अजयमुळे करण जोहरसोबत असलेली २५ वर्षांची मैत्री तोडली. 

Web Title: On the second day of marriage, Ajay Devgn had reprimanded Kajol, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.