​चित्रपटाच्या यशासाठी स्क्रिप्ट महत्त्वाची : साजीद खान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:12 IST2017-10-27T09:07:56+5:302017-10-27T15:12:07+5:30

-रवींद्र मोरे  चित्रपट निर्माते साजीद खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९५ मध्ये ‘मै भी डिटेक्टिव’ या टीव्ही शोद्वारे केली ...

Script is important for the success of the film: Sajid Khan! | ​चित्रपटाच्या यशासाठी स्क्रिप्ट महत्त्वाची : साजीद खान !

​चित्रपटाच्या यशासाठी स्क्रिप्ट महत्त्वाची : साजीद खान !

ong>-रवींद्र मोरे 

चित्रपट निर्माते साजीद खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९५ मध्ये ‘मै भी डिटेक्टिव’ या टीव्ही शोद्वारे केली आहे. शिवाय दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘डरना जरुरी है’ हा होता. साजीद खान यांनी दिग्दर्शकाच्या करिअरची सुरुवात जरी एका हॉरर चित्रपटातून केली, मात्र त्यांचा चित्रपट बनविण्याचा कल हा कॉमेडी चित्रपटांकडेच दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक कॉमेडी चित्रपट बनविले असून सुपरहिटदेखील ठरले आहेत. त्यांचे भविष्यात चित्रपटांविषयी काय प्लॅनिंग आहे, याबाबत साजीद यांच्याशी मारलेल्या गप्पा...

* चित्रपट बनविताना आपण नेमके कोणत्या विषयाला प्राधान्य देतात?
- लोकांना कोणता विषय आवडतो, याचा विचार करु नच चित्रपट बनवावा लागतो. विशेष म्हणजे माझ्या दृष्टिने चित्रपट म्हणजे निव्वळ एंटरटेनमेंट आहे. असे एंटरटेनमेंट जे सर्व परिवार पाहू शकतील. यात मी कॉमेडीला जास्त प्राधान्य देतो. आतापर्यंत मी बहुतांश कॉमेडीच चित्रपट केले आहेत आणि ते लोकांना खूप आवडलेही आहे. त्याच अनुशंघाने मी सध्या एका कॉमेडी शो जज करतोय. 

* सध्या तुम्ही एक हॉरर चित्रपट बनविण्याचा विचारात आहात असे कळले आहे, काय सांगाल?
- ही बातमी पूर्ण खरीही नाही आणि पूर्ण खोटीही नाही. आमच्या इंडस्ट्रीमध्ये जास्त हॉरर चित्रपट बनत नाहीत. माझ्या करिअरची सुरुवात मी एका हॉरर चित्रपटापासूनच केली आहे. हॉरर चित्रपटात भूत, प्रेत हे लोकांना आवडतात, म्हणून मी तेच दाखविण्याचा प्रयत्न करतो. सध्या मला याच आशयावर सुचित करण्यात आले आहे. मात्र जर चांगली स्क्रिप्ट डोक्यात आली तर मी नक्कीच एक चांगला हॉरर चित्रपट बनवू शकतो. 

* बॉलिवूडमध्ये सध्या बरेच दिग्दर्शक-अभिनेते त्यांच्या मुलांना लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत, याबाबत काय सांगाल?
- कोण कुणाला लॉन्च करत आहे, याचा फिल्म इंडस्ट्रिवर काहीच परिणाम होत नाही. विशेष म्हणजे प्रेक्षक कुणाला पसंत करतात, यावर त्या नवोदित अभिनेत्याचे यश अवलंबून असते. आतापर्यंत अनेकजणांनी काहींना लॉन्च केले, मात्र ज्यांना प्रेक्षकांनी पसंत केले तेच अभिनेते या इंडस्ट्रिमध्ये यशस्वी आहेत. 

* ‘हे बेबी’ (२००७) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, याचा सिक्वल करु इच्छिता का?
- चित्रपटाचे यश हे त्याच्या स्क्रिप्टवर अवलंवून असते. चित्रपटाच्या शुटिंगला वेळ लागत नाही, मात्र त्याची स्क्रिप्ट बनवायला खूप वेळ लागतो. जर ‘हे बेबी’च्या सिक्वलसाठी उत्तम स्क्रिप्ट मिळाली तर नक्कीच बनवेल. 

* आपण सध्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा कॉमेडी शो जज करत आहात, त्याबाबत काय सांगाल?
- मी पहिल्यांदाच एक कॉमेडी शो जज करतोय. हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा ठरणार आहे. शिवाय सोबत असलेले अक्षय कुमार आणि श्रेयस तळपदे हे तर माझ्यासाठी भावाप्रमाणेच वाटत आहेत. या शोमध्ये संपूर्ण परिवाराचे निख्खड मनोरंजन होऊन सर्वजण पोट धरून हसायला हवेत, हाच आमचा खरा उद्देश आहे. 

Web Title: Script is important for the success of the film: Sajid Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.