स्कार्लेट विल्सनचे आयटम साँग ह्या सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:36 IST2018-10-10T20:36:00+5:302018-10-10T20:36:00+5:30
अभिनेता नील नितीन मुकेश आणि टीना देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दशहरा' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्कार्लेट विल्सनचे आयटम साँग ह्या सिनेमात
अभिनेता नील नितीन मुकेश आणि टीना देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दशहरा' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. नील नितीन मुकेशचा हिरो म्हणून हा पहिलाच मोठा चित्रपट असणार आहे. याशिवाय या चित्रपटात एका आयटम साँगचा समावेश आहे. 'माई रे...' असे या आयटम साँगचे नाव असून हे गाणे बाहुबली फेम स्कारलेट विल्सनवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात तिने अंग प्रदर्शन केले असल्यामुळे या गाण्याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
या आयटम सॉंगला रेखा भारद्वाज आणि मधुश्री यांनी गायले आहे. हे गाणे मुळात दशहरा साठी नव्हतेच. हे गाणे “राजीज’मध्ये घेतले जाणार होते. मात्र काही कारणामुळे त्याचा समावेश “राजीज’मध्ये होऊ शकला नाही. “दशहरा’मध्ये प्रेक्षकांना इंटरेस्ट वाटू शकेल, अशी कोणती तरी कलाकृती असायला वाटल्याने त्यावर स्कार्लेट विल्सनचा परफॉर्मन्स बसवण्यात आला. आता स्कार्लेट विल्सनचा पहिलाच आयटम परफॉर्मन्स असल्यामुळे दशहरापेक्षा हे गाणे बघायलाच प्रेक्षकांना अधिक रस असेल.
गुन्हे आणि राजकारणाने प्रेरित असलेला 'दशहरा' हा चित्रपट २६ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष वात्सल्य यांनी केले आहे. या चित्रपटात नील व टीना यांच्यासह गोविंद नामदेव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाआधी नील 'वजीर' या सिनेमात दिसला होता. याशिवाय 'प्रेम रतन धन पायो', 'आ देखें जरा', 'शॉर्टकट रोमियो', 'प्लेअर्स','जॉनी गद्दार' यासारख्या चित्रपटात तो अभिनय करून चुकला आहे. नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अॅक्शन करताना दिसणार आहे. 'साहो' या चित्रपटात नीलची भूमिका अतिशय दमदार असणार आहे. बाहुबलीनंतर प्रभासही या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे.