"तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही.." सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रितेश देशमुख झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 12:17 IST2023-03-09T11:52:07+5:302023-03-09T12:17:49+5:30

सतीश आज या जगात नाहीत याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

Satish kaushik passed away Riteish Deshmukh pays tribute to actor | "तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही.." सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रितेश देशमुख झाला भावुक

"तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही.." सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रितेश देशमुख झाला भावुक

अभिनेता आणि दिग्दर्शक राहिलेल्या सतीश कौशिक यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप काळ घालवला आहे. मौसममध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या विनोदी शैलीने लाखो-करोडो चाहत्यांची मने जिंकली.सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या सतीश कौशिकने आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले. सतीश आज या जगात नाहीत याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. 
सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता रितेश देशमुखलाही सतीश कौशिक यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांचा आनंदी फोटो शेयर करून रितेश लिहितो, तुम्ही गेला आहात यावर विश्वास बसत नाही. तुमचे मनमोकळे हास्य अजूनही माझ्या कानात घुमते.

एक दयाळू आणि दिलखुलास सह-अभिनेता तुम्ही होता.. तुम्ही अनेक गोष्टी नकळत शिकवून जायचा. तुमची आठवण येईल, तुमचा वारसा आमच्या हृदयात कायम जिवंत राहील. अशा शब्दात रितेश देशमुखने सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सतीश कौशिक यांनी जवळजवळ तीन दशके बॉलिवूडमध्ये घालविली. त्यांनी पूर्ण जोमाने काम केले. कधी त्यांनी अभिनय केला तर कधी सिनेमाचं दिग्दर्शन केले. वयाच्या या टप्प्यावरही सतीश कौशिक फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत असे. ते व्यायामशाळेत वर्कआउट करत असे. सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि व्यायाम करताना त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचे. 


 

Web Title: Satish kaushik passed away Riteish Deshmukh pays tribute to actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.