'एअरटेल ४जी' गर्ल आठवतंय? सुंदरतेच्या बाबतीत आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 13:47 IST2020-02-28T13:46:55+5:302020-02-28T13:47:13+5:30
ती रातोरात स्टार झाली होती. बरीच वर्षे ती एअरटेलचा चेहरा होती.

'एअरटेल ४जी' गर्ल आठवतंय? सुंदरतेच्या बाबतीत आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर!
वेळेनुसार प्रत्येक जण बदलत जातो. छोट्या पडद्यावरील असे कित्येक कलाकार आहेत जे एखाद्या जाहिरातीमधून किंवा मालिकेमधून रातोरात घराघरात पोहोचतात आणि अचानक गायबदेखील होतात.
पाच ते सहावर्षांपूर्वी एअरटेलच्या 4जी जाहिरातीमधून साशा छेत्री हा चेहरा घराघरात पोहोचला होता. रातोरात साशा स्टारदेखील झाली होती. बरीच वर्षे साशा एअरटेलचा चेहरा होती. साशीने २०१५ साली एअरटेलसोबत जोडली गेली होती आणि तिने एअरटेल ४जीचा प्रचार केला होता. आता साशा अधिक सुंदर दिसू लागली आहे.
साशा छेत्री देहरादूनला राहणारी असून तिथेच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण संपल्यानंतर साशी मुंबईत आली आणि तिथे तिने जाहिरातीचं प्रशिक्षण घेतलं. यासोबतच तिने काम करायला सुरूवात केली. कामादरम्यान तिला एअरटेलच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली आणि हळूहळू ती घराघरात एअरटेल ४जी गर्ल नावाने प्रसिद्ध झाली.
साशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याच्या इन्स्टाग्राम फोटोंवर नजर टाकली तर ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही याचा अंदाज येतो. साशाच्या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो असतो.
काही दिवसांपूर्वी साशा तिच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आली होती. साशा म्युझिक डिरेक्टर व सिंगर सचिन गुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.