आणखी एक सीक्वल! आमिर खान नाही; ‘हा’ अभिनेता बनणार एसीपी राठौड!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 17:56 IST2018-07-31T17:55:37+5:302018-07-31T17:56:04+5:30
आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. आमिरच्या एका सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

आणखी एक सीक्वल! आमिर खान नाही; ‘हा’ अभिनेता बनणार एसीपी राठौड!!
आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. पण एकार्थाने चांगली आणि एकार्थाने वाईटही. चांगली ही की, आमिरच्या एका सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि वाईट बातमी ही की, या सीक्वलमध्ये आमिर नसणार आहे. आम्ही बोलतोय ते ‘सरफरोश’ या चित्रपटाबद्दल. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल येतोय. सुप्रसिद्ध ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी याबाबत माहिती दिली.
#AamirKhan 's Iconic #Sarfarosh is getting a sequel..
— Ramesh Bala (@rameshlaus) July 31, 2018
Instead of #Aamir , #JohnAbraham to play the ACP #Rathod character in the movie.. pic.twitter.com/c39Rl6CwGe
‘सरफरोश’मध्ये आमिर खाने एसीपी राठौडची भूमिका साकारली होती. पण याच्या सीक्वलमध्ये ही भूमिका आमिर नाही तर जॉन अब्राहम साकारताना दिसेल. जॉनचा नुकताच रिलीज झालेला ‘परमाणु’ हा चित्रपट चांगलाच गाजला. मध्यंतरी जॉनच्या करिअरची गाडी रूळावरून घसरली होती. पण ‘परमाणु’ने जॉनच्या करिअरची गाडी पुन्हा रूळावर आली. सध्या जॉन ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात बिझी आहे. यानंतर जॉन ‘सरफरोश’च्या सीक्वलच्या तयारीला लागणार आहे.
‘सरफरोश’मध्ये आमिर खानसोबत सोनाली बेंद्रे लीड रोलमध्ये होती. याशिवाय नसीरूद्दीन शहा आणि मुकेश ऋषी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. आता ‘सरफरोश’च्या सीक्वलमध्ये कुणाकुणाची वर्णी लागते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. तूर्तास या चित्रपटाबद्दल फार माहिती समोर आलेली नाही. पण ‘सरफरोश’चा सीक्वल येणार, इतकेच चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पुरेसे आहे.