‘सरबजीत’ आॅस्करच्या यादीत येताच बिग बी झाले आनंदित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 19:29 IST2016-12-23T19:29:19+5:302016-12-23T19:29:19+5:30

सरबजीत सिंग याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘सरबजीत’ मध्ये ऐश्वर्या रॉय बच्चनने सरबजीतची बहीण दलबीर कौरची भूमिका केली आहे. चित्रपट ...

'Sarabjeet' gets Big B in the Oscars list! | ‘सरबजीत’ आॅस्करच्या यादीत येताच बिग बी झाले आनंदित!

‘सरबजीत’ आॅस्करच्या यादीत येताच बिग बी झाले आनंदित!

बजीत सिंग याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘सरबजीत’ मध्ये ऐश्वर्या रॉय बच्चनने सरबजीतची बहीण दलबीर कौरची भूमिका केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐशच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. नुकतेच सरबजीतचे नाव आॅस्करच्या यादीत समाविष्ट झाल्याचे कळताच सासरेबुवा बिग बी आनंदित झाले आहेत. सुनबाई ऐश्वर्या रॉय बच्चन हिचे नाव बायोपिकमुळे आॅस्करच्या यादीत आल्याने अमिताभ बच्चन यांचा ऊर समाधान आणि अभिमानाने भरून आला आहे. 

बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त करताना म्हटले आहे,‘अ‍ॅण्ड न्यूज कम्स इन दॅट फिल्म ‘सरबजीत’ हॅज बीन सिलेक्टेड फॉर द आॅस्कर्स...अवर विशेस अवर सपोर्ट अवर लव्ह अ‍ॅण्ड अवर प्राईड!’ ८९ व्या आॅस्करच्या रेसमध्ये आता सुशांतसिंग राजपूत याचा ‘एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपटही असणार आहे. या लिस्टमध्ये स्पर्धक म्हणून ‘ला ला लँण्ड’,‘मूनलाईट’,‘सायलेंस’,‘डेडपूल’,‘सुसाईड स्क्वॉड’,‘कॅप्टन अमेरिका:सिव्हील वॉर’ यांचाही समावेश आहे. 

आॅस्करमध्ये आपल्या चित्रपटाचे नाव समाविष्ट व्हावे असे कोणत्या कलाकाराला वाटत नाही. प्रत्येक कलाकार आॅस्करमध्ये चित्रपट दाखल होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. आॅस्करमध्ये चित्रपट दाखल होण्याचे ऐश्वर्याचे हे स्वप्न देखील आता पूर्ण झाले आहे. 

Web Title: 'Sarabjeet' gets Big B in the Oscars list!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.