"मला अनेक ऑफर्स आल्यात, पण...", बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार सारा तेंडुलकर? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:02 IST2025-05-09T14:00:38+5:302025-05-09T14:02:11+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकीच्या निर्णयाचं सध्या तिचे चाहते कौतुक करत आहेत.

Sara Tendulkar Rejects Bollywood Chooses Social Impact Over Stardom Linkup Buzz Siddhant Chaturvedi | "मला अनेक ऑफर्स आल्यात, पण...", बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार सारा तेंडुलकर? म्हणाली...

"मला अनेक ऑफर्स आल्यात, पण...", बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार सारा तेंडुलकर? म्हणाली...

Sara Tendulkar On Bollywood : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar ) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar ) नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.  सारा कधी तिच्या बॉलिवूडच्या मित्रांसोबत पार्टी करताना स्पॉट होते. तर कधी क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच सारा आणि शुबमन यांनी इन्स्टाग्रामवर एकमेंकाना अनफॉलो केलं. यानंतर दोघांच्या बेक्रअप झाल्याचं बोललं जात होतं. यातच साराचं नाव अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी जोडलं जातयं. या सर्व चर्चांमध्ये सारा ही बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार अशी चर्चा रंगली. पण, आता साराने यावर मौन सोडलं आहे.

सारानं नुकतंच व्होग इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तिनं अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. अभिनय हे तिच्या स्वभावाशी सुसंगत नाही, असं साराला वाटतं. ती म्हणाली, "मला कॅमेऱ्याची भीती वाटते. अभिनय मला समाधानापेक्षा जास्त मानसिक दबाव देतो. म्हणून मी अनेक ऑफर्स नाकारल्या आहेत". साराने हेही कबूल केलं की तिचा अंतर्मुख स्वभाव आहे, प्रसिद्धीपासून दूर राहणं आणि शांतपणे स्वतःचं आयुष्य जगण, हेच तिला जास्त जवळचं वाटतं. 

सारा आतापर्यंत अनेक ब्रँड कॅम्पेन्समध्ये, मॅगझीन कव्हर्सवर झळकली आहे. याबद्दल ती म्हणाली, "मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. मी फक्त तीच कामं स्वीकारते, ज्यामध्ये प्रामाणिकपणा आणि सामाजिक परिणाम दिसतो". साराची शैक्षणिक कारकीर्दही तितकीच प्रभावी आहे. तिचं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून 'बायोमेडिकल सायन्सेस'मध्ये पदवी आणि 'क्लिनिकल न्यूट्रिशन आणि पब्लिक हेल्थ'मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. 


सध्या सारा सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये एक संचालक म्हणून काम करतेय. सारा तेंडुलकर ही २७ वर्षांची आहे. एवढ्या कमी वयामध्येच ती सामाजिक विकासासाठी काम करतेय. तिचं मुख्य लक्ष भारतातील गरजूंसाठी आरोग्य आणि पोषणविषयक योजना विकसित करण्यात आहे. सारानं तिच्या मुलाखतीत सांगितलं, "चित्रपटात काम करणं माझं स्वप्न नव्हतं. मला माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करायचा आहे". एका स्टारची मुलगी असूनही सारा स्टारडमच्या मागे धावणारी नाही. तर समाजात खरा बदल घडवण्याच्या दिशेने काम करणारी नव्या पिढीतील संवेदनशील आणि जबाबदार चेहरा आहे.

Web Title: Sara Tendulkar Rejects Bollywood Chooses Social Impact Over Stardom Linkup Buzz Siddhant Chaturvedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.