शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? दोघांच्या 'या' निर्णयामुळं होतेय चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 15:54 IST2025-04-20T15:53:26+5:302025-04-20T15:54:52+5:30

क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता दोघांच्या एका कृतीमुळे त्यांचा ब्रेकअप झाला असल्याचं म्हटलं जात आहे.

Sara Tendulkar and Shubman Gill Unfollow Each Other On Instagram Spark Breakup Rumours | शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? दोघांच्या 'या' निर्णयामुळं होतेय चर्चा!

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? दोघांच्या 'या' निर्णयामुळं होतेय चर्चा!

Sara Tendulkar and Shubman Gill: दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.  लूकव्यतिरिक्त सारा तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून सारा ही भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्यात. मात्र, दोघांपैकी कोणीही या अफवांना दुजोरा किंवा नाकारलं नाही. पण, आता या जोडीचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. 

सारा आणि शुबमन यांनी इन्स्टाग्रामवर एकमेंकाना अनफॉलो केलं आहे. यावरुनच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरलाय. या दोघांच्या ब्रेकअपचं कारण एक टिव्ही सुंदरी ठरल्याचीही चर्चा आहे.  अवनीत आणि शुबमन यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. तेव्हापासून शुबमन हा अभिनेत्री अवनीत कौर हिला डेट करत असल्याच्या अफवा उठल्यात. अवनीत कौर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  टेलिव्हिजनद्वारे घरघरात पोहचल्यानंतर अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे.


दरम्यान, क्रिकेटर हार्दिक पंड्या याने २०२० मध्ये सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे सारा आणि शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर चाहते शुबमनला कायम साराच्या नावानं चिडवताना दिसलेत.  शुभमन आणि साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटपटू सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. तर सारा ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये संचालकपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडतेय. 
 

Web Title: Sara Tendulkar and Shubman Gill Unfollow Each Other On Instagram Spark Breakup Rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.