​‘स्टुडंट आॅफ द इयर २’मधून सारा खान बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 17:56 IST2016-09-25T10:23:07+5:302016-09-25T17:56:00+5:30

सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी सारा ‘स्टुडंट आॅफ द इयर २’ या सिनेमातून ...

Sara Khan out of 'Student of the Year 2'? | ​‘स्टुडंट आॅफ द इयर २’मधून सारा खान बाहेर?

​‘स्टुडंट आॅफ द इयर २’मधून सारा खान बाहेर?

फ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी सारा ‘स्टुडंट आॅफ द इयर २’ या सिनेमातून चंदेरी दुनियेत पदार्पण करणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आता असे दिसतेय की, तसे होणे नाही!

कारण साराचे करिअर सांभाळणाऱ्या एजन्सीला तिने सोडले असून दुसऱ्या एजन्सीसोबत नवा करारदेखील केलेला आहे. त्यामुळे जी एजन्सी करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांच्या कलाकारांना मॅनेज करते तिला साराने सोडले असल्यामुळे तिचा ‘एसओटीवाय २’मधून पत्ता कट झाल्याचे स्पष्ट आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करणार असून टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. आलिया, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनसारख्या आजच्या आघाडीच्या स्टार्सचे करिअर ‘स्टुडंट आॅफ द इयर’द्वारे लाँच झाले होते.

त्यामुळे साराला ब्रेक देण्यासाठी हा सिनेमा बेस्ट पर्याय असल्याचे बोलले जात होते.

Web Title: Sara Khan out of 'Student of the Year 2'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.