सारा अली खानने ड्रग्स प्रकरणातील चौकशीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केला पहिला मेसेज
By गीतांजली | Updated: October 25, 2020 15:00 IST2020-10-25T15:00:00+5:302020-10-25T15:00:02+5:30
सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात सारा अली खानचे नाव आल्यापासून ती सोशल मीडियावरुन गायब होती.

सारा अली खानने ड्रग्स प्रकरणातील चौकशीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केला पहिला मेसेज
सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात सारा अली खानचे नाव आल्यापासून ती सोशल मीडियावरुन गायब होती. साराने शेवटची पोस्ट 10 सप्टेंबरला इन्स्टाग्रामवर केली होती. त्यानंतर ती गायब होती. गेल्या महिन्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी साराची चौकशी केली होती. साराला जेव्हा एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आला त्यावेळी ती आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिमसोबत गोव्यात होती. त्यानंतर ती मुंबईत आली.
NCBच्या चौकशीनंतर सारा अली खानने सोशल मीडियावर केला पहिला मेसेज
लॉकडाऊनमध्ये सारा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती पण ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर ती ना इन्स्टाग्रामवर ना ट्विटरवर कुठेच सक्रिय दिसली नाही. एनसीबीच्या चौकशीनंतर ती एकही पोस्ट सोशल मीडियावर केली नव्हती. जवळपास एक महिन्यानंतर सारा पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. साराचे तिच्या फॅन्सना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारा आपला फोटो पोस्ट करत लिहिले, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.''
वरुण धवन आणि सारा अली खानचा कॉमेडी ड्रामा 'कुली नंबर 1' ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार सारा अली खान वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'चे प्रमोशन करणार नाही आहे.