सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या शेवटच्या भेटीविषयी सांगतेय सारा अली खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:33 IST2019-03-13T14:30:33+5:302019-03-13T14:33:27+5:30
कॉफीअनसीनमध्ये सैफ अली खान, त्याची पूर्वपत्नी अमृता सिंग, सारा शेवटचे कधी फिरायला गेले होते याविषयी सैफ सांगणार आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या शेवटच्या भेटीविषयी सांगतेय सारा अली खान
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटाला अनेक वर्षं झाले आहेत. त्या दोघांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. सैफने काही वर्षांपूर्वी करिना कपूरसोबत लग्न केले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे. सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान काही आठवड्यांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमात झळकले होते. या कार्यक्रमाचा हा भाग प्रेक्षकांचा खूपच आवडला होता. या कार्यक्रमाच्या भागात प्रक्षेपित न करण्यात आलेले काही व्हिडिओ प्रेक्षकांना कॉफीअनसीन मध्ये पाहायला मिळणार आहेत. यामध्ये सैफ अली खान, त्याची पूर्वपत्नी अमृता सिंग, सारा शेवटचे कधी फिरायला गेले होते याविषयी सैफ सांगणार आहे.
करण जोहरने कॉफी विथ करण या कार्यक्रमात सैफ अली खानला प्रश्न विचारला होता की, तू अमृताला शेवटचा कधी भेटलास? यावर सैफने सांगितले, सारा कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना आम्ही दोघे तिला तिथे सोडायला गेलो होते. त्यावेळी आम्ही न्यूयार्कमध्ये एकत्र डिनरला गेलो होतो. या भेटीविषयी साराला विचारले असता तिने सांगितले, आई आणि अब्बा मला सोडायला आले याचा मला एक प्रचंड आनंद झाला होता. मी आणि अब्बा तिथे डिनर करत असताना आम्ही तिथे आईला बोलवायचे ठरवले आणि ती देखील आमच्यासोबत डिनरला आली होती. आम्ही त्यावेळी एकमेकांसोबत खूपच चांगला वेळ घालवला. त्यानंतर मला कॉलेजमधील होस्टेलमध्ये सोडायला आल्यानंतर आईने मला बेडवर चादर टाकून दिली होती तर अब्बाने लॅम्पमध्ये बल्ब लावला. माझ्यासाठी तो दिवस खूप चांगला होता.
सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिच्या सिम्बा या चित्रपटातील कामाचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले होते. आता ती लव्ह आज कल २ या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. विशेष म्हणजे लव्ह आज कल या चित्रपटात साराचे वडील सैफ अली खानने मुख्य भूमिका साकारली होती.