जेव्हा आलिया भटमुळे आली होती सारा अली खानवर रडायची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 19:21 IST2020-08-28T19:05:25+5:302020-08-28T19:21:23+5:30
सारा अली खान कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते

जेव्हा आलिया भटमुळे आली होती सारा अली खानवर रडायची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं
सारा अली खान कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत नेहमी शेअर करत असते. लॉकडाऊनच्या काळातही सारा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात होती. यावर्षाच्या सुरुवातील एका इव्हेंट दरम्यान सारा अली खान रडताना दिसली. सारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या इव्हेंटमध्ये सारा गली बॉय सिनेमातले डायलॉग बोलताना दिसली. डायलॉग बोलता बोलता ती अचानक रडायला लागली. इव्हेंटमध्ये तिला तीन वेगवेगळ्या इमोशन्समध्ये हे डायलॉग बोलायले सांगितले होते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, सारा अली खान आणि वरुण धवनचा कुली नंबर 1 OTTवर रिलीज होणार आहे. सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. अजून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. वरुणचे फॅन्स याची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहतायेत.
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत. इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.