अमृता सिंगसोबत फोटोतील या मुलीला तुम्ही ओळखलंत का?, आता आहे लाखों तरूणांच्या हृदयाची धडकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 17:04 IST2019-09-04T17:04:18+5:302019-09-04T17:04:48+5:30
अमृता सिंगसोबत असलेली ही मुलगी आता बॉलिवूडची अभिनेत्री आहे.

अमृता सिंगसोबत फोटोतील या मुलीला तुम्ही ओळखलंत का?, आता आहे लाखों तरूणांच्या हृदयाची धडकन
अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना भावला. ती आता लवकरच कार्तिक आर्यन सोबत लव्ह आज कल २ मध्ये झळकणार आहे. सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे खाजगी जीवन देखील चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत तिचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात रंगल्या आहेत. पण तिने यावर मौन राखणेच पसंत केले आहे. नुकताच साराने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
साराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत अमृता सिंग दिसत आहे. हा फोटो त्यावेळचा आहे ज्यावेळी सारा आली खानचं वजन वाढलेलं होतं. हा फोटो शेअर करून साराने लिहिलं की, जुना फोटो. जेव्हा मला फेकू शकत नव्हते. या फोटोवर अभिनेता कार्तिक आर्यनने कमेंट केली की ही मुलगी सारा अली खानसारखी वाटत आहे.
साराच्या सौंदर्यावर आज अनेकजण फिदा आहेत. साराच्या फिगरचे चांगलेच कौतुक तिचे चाहते करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी साराचे वजन ९० किलो होते. तिने अतिशय मेहनतीने तिचे वजन कमी केले आहे.
साराला Polycystic ovary syndrome (PCOD) चा त्रास असल्याने तिचे वजन काही केल्या कमी होत नव्हते. पण वजन कमी करायचे या तिच्या निर्णयावर ती ठाम होती.
तिने खूप सारा व्यायाम आणि डाएट करत दीड वर्षांत २० किलो वजन कमी केले.