Video : मेकअप सुरू असतानाच सारा अली खानसोबत घडली भयावह घटना, चेहऱ्याजवळ झाला ब्लास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 10:25 IST2022-01-24T10:24:46+5:302022-01-24T10:25:31+5:30

Sara Ali Khan had an accident : चित्रपटाच्या सेटवर एक भयावह घटना घडली. यामुळे सारा प्रचंड घाबरली. याचा घटनेचा व्हिडीओ साराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

Sara Ali Khan had an accident in the makeup room As Bulb Explodes Near Her Face Watch Video | Video : मेकअप सुरू असतानाच सारा अली खानसोबत घडली भयावह घटना, चेहऱ्याजवळ झाला ब्लास्ट

Video : मेकअप सुरू असतानाच सारा अली खानसोबत घडली भयावह घटना, चेहऱ्याजवळ झाला ब्लास्ट

सारा अली खान  (Sara Ali Khan) बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री. अमृता सिंग व सैफ अली खानची लेक सारा बॉलिवूडमध्ये आली आणि फार कमी वेळात तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज साराला अमृता व सैफची लेक म्हणून नाही तर बॉलिवूड स्टार म्हणून लोक ओळखतात. याच सारासोबत चित्रपटाच्या सेटवर एक भयावह घटना घडली. यामुळे सारा प्रचंड घाबरली. याचा घटनेचा व्हिडीओ साराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

व्हिडीओत सारा मेकअप रूममध्ये टचअप करताना दिसतेय. मेकअप करताना ती बोलतानाही दिसते. स्टाफ, जीतूला दोन नारळ पाणी आणायला सांगा..., असं ती म्हणते. यादरम्यान मेकअप आर्टिस्ट तिचा टच अप करत असताना अचानक बल्बचा ब्लास्ट होतो आणि तो फुटतो. सारा यामुळे प्रचंड घाबरते. ती जोरात ओरडते. या धांदलीत कॅमेराही खाली पडतो. ‘मॉर्निंग लाइक धिस’..., असं लिहित साराने हा व्हिडीओ शेअर केला आहे.  अगदी साराच्या चेहऱ्याजवळ बल्बचा ब्लास्ट झाला. सुदैवाने यात साराला कोणतीही इजा झाली नाही.

सारा अली खान सध्या इंदूरमध्ये आहे. येथे ती विकी कौशलसोबत एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन स्टारर ‘लुकाछिपी’चा सीक्वल असल्याचं मानलं जातंय. मात्र अद्याप याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. तिच्या या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.याआधी सारा ‘अतरंगी रे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यात ती अक्षय कुमार व धनुषसोबत दिसली होती.
 

Web Title: Sara Ali Khan had an accident in the makeup room As Bulb Explodes Near Her Face Watch Video