Sara Ali Khan : 'एनजीओ' तील मुलांसोबत साजरा केला सुशांतचा वाढदिवस, साराचे होतेय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 12:18 PM2023-01-22T12:18:34+5:302023-01-22T12:19:52+5:30

सुशांतचा वाढदिवस साराने एनजीओतील मुलांसोबत साजरा केला. त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

sara ali khan celebrated sushant singh rajput birthday with children in NGO shares happiness with them | Sara Ali Khan : 'एनजीओ' तील मुलांसोबत साजरा केला सुशांतचा वाढदिवस, साराचे होतेय कौतुक

Sara Ali Khan : 'एनजीओ' तील मुलांसोबत साजरा केला सुशांतचा वाढदिवस, साराचे होतेय कौतुक

googlenewsNext

Sara Ali Khan :  दिवंगत बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपुत (Sushant Singh Rajput) आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. काल त्याचा वाढदिवस असल्याने सर्वांच्याच आठवणी ताज्या झाल्या. अभिनेत्री सारा अली खान हिने 'केदारनाथ' सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. यामध्ये सुशांतसिंग तिचा सहकलाकार होता. सुशांतचा वाढदिवस साराने एनजीओतील मुलांसोबत साजरा केला. त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

सुशांतसाठी साराची खास पोस्ट 

'बाल आशा ट्र्स्ट' या एनजीओमध्ये काल सारा अली खान आली होती. तेथील मुलांसोबत तिने केक कट करत सुशांतसिंगचा वाढदिवस साजरा केला. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसला. साराने कॅप्शनमध्ये लिहिले, 'सुशांत, वाढदिवसाच्या शुभेच्छा. इतरांना खूष करणं तुझ्यासाठी किती महत्वाचं होतं हे मला माहित आहे. तू आम्हाला वरुन बघत आहेस, वरती चंद्राजवळ तू पोहोचला आहे, मला आशा आहे आज आम्ही तुझ्या चेहऱ्यावर हसू आणलं असेल. असाच चमकत राहा. जय भोलेनाथ.'

साराने एनजीओचे ही आभार मानले आहेत. तिने लिहिले, 'आज हा दिवस खास बनवण्यासाठी तुमचेही आभार. तुमच्यासारखे लोकच जगाला सुंदर बनवतात, सुरक्षित आणि आनंदी बनवतात. असाच आनंद पसरवत राहा.'

साराच्या या पोस्टवर चाहतेही भावूक झाले आहेत. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुकही केले आहे. १४ जून २०२० रोजी सुशांतने आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे अनेकांना धक्काच बसला. आजही सुशांतच्या आठवणीत चाहते भावूक होतात. खूप गुणी अभिनेता असा अचानक सोडून गेल्याची सर्वांनाच खंत आहे.

Web Title: sara ali khan celebrated sushant singh rajput birthday with children in NGO shares happiness with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.