जाणून घ्या, सारा अली खान व कार्तिक आर्यनच्या त्या ‘व्हायरल’ फोटोमागचे सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:02 IST2019-03-13T14:58:24+5:302019-03-13T15:02:38+5:30
सैफ अली खानची लेक सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता नव्याने सांगायची गरज नाही. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जाणून घ्या, सारा अली खान व कार्तिक आर्यनच्या त्या ‘व्हायरल’ फोटोमागचे सत्य!
सैफ अली खानची लेक सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता नव्याने सांगायची गरज नाही. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून सारा अन् कार्तिक कायम चर्चेत आहेत. पुढे ही चर्चा इतकी रंगली की, चाहत्यांनी सारा आणि कार्तिकच्या जोडीचे ‘सार्तिक’ असे नामकरणही करून टाकले आणि अशात सारा आणि कार्तिकचा एक फोटो समोर आला. सारा आणि कार्तिक कथितरित्या रिलेशनशिपमध्ये आहेत, हे सागण्यासाठी हा एकच फोटो पुरेसा होता. त्यामुळेच हा फोटो प्रत्येकासाठी धक्का होता. या फोटोत सारा व कार्तिक दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन दिसले. मग काय, क्षणात व्हायरल झाला. चाहत्यांनाही जोर चढला.
पण हे काय? अगदी काही क्षणांत सोशल मीडियावर वा-याच्या वेगाने व्हायरल झालेल्या या फोटोची सत्यताही तितक्याच लवकर बाहेर आली. होय, सारा व कार्तिकचा हा फोटो फेक निघाला. कुणीतरी अतिशय कुशलतेने एडिट करून हा फेक फोटो व्हायरल केल्याचेही समोर आले.
आता हा फेक फोटो तयार करणारे कोण, हेही ऐका. दुसरे कुणी नाही तर या दोघांचाही एक फॅनक्लब. एका फॅनक्लबने सारा व कार्तिकचा हा फोटो बनवला आणि तो व्हायरल केला. आहे ना, गंमत.
सारा व कार्तिक दोघेही सध्या इम्तियाज अलीच्या ‘लव आजकल 2’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच ही जोडी एकत्र दिसणार आहे.